Skip to main content

ऊरी...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 29/09/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे झोपेत असताना काशमीरात तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फन्टरीतल्या एका मित्राचा फोन येतो...... आवाज कमालीचा दबलेला... माझा जीव कातरून जातो... . तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या ---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती... आता ड्युटी संपली- पहाटेपासणं करतोय फोन... . . मी त्याच्या घरी फोन करतो... 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........ . . गावाकडच्या एका मित्राला त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... . . परत फोन करतो... पलीकडून वाहिनीचा घाबरलेला -(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो... . थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता...?? . . वाहिनी रडायला लागतात... जोरात! बांध फोडतात... त्यांचा झालेला अवतार -मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसायला लागतो... तोंडा नाकातून गळत असलेली लाळ -माझ्या 250 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते... . शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात... . . . . फोन उचलायला भीती वाटतेय भैय्या आता... जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा -----------------------------------------------------------------------------------------

वाचने 4508
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

साधारण परिस्थितीतही खरच रात्री अपरात्री आलेला फोन नको वाटतो. इथे तर नवरा काश्मिरात आहे. शुभं भवतु

:( राजकीय चुकांची आणि राजकीय दुबळेपणाची किंमत, सजग नसलेल्या जनतेला... आणि सबळ असलेल्या सैन्यालाही मोजावी लागते, हे दुर्दैवी सत्य आहे :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तंतोतंत सहमत. मिपा विचारवंत्त संदीप ताम्हणकरांनी या लेखाची रोज किमान ५ तरी पारायणे करावीत अशी माझी शिफारस आहे. भोट सिव्हीलीयन नाखु

वाचताना राग , वेदना , चीड ... सगळं एकच वेळी अनुभवलं ... लेखनाला चांगलं म्हणावं का नाही ... याबद्दल मत होत नाहीये , मन धजावत नाहीये ... !!

अशी परिस्थिती आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या कोणत्याही सैनिकावर यापुढे येउ नये ! होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

काळजीने सैनिकांच्या घरची मंडळी रोज हजार मरणे मरत असतात. हे कधे थांबायचं!

वरिल सर्व प्रतिक्रियांशी सहमत. अवांतरः चांगलं लिहिलंय ह्यात वाद नाही पण फेसबुकवर फिरत होतं हे... त्या मूळ पोस्टचे लेखक तुम्हीच का?

In reply to by संदीप डांगे

जर तुम्ही सचिन अटकरे यांची पोस्ट वाचली असेल तर हेच ते.