Skip to main content

मौजमजा

खुलता खुळी खुलेना...

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

माझ्या मना लागो छंद....!

लेखक अमृत यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
अर्ध्याहून अधिक बालपण ३ खोल्यांच्या आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्यांतून गेले त्यामूळे बागेशी व त्यायोगे झाडांशी थेट असा संबंध फारसा आला नाही. नाही म्हणायला मावशीच्या घरी थोडीफार झाडं होती पेरू, डाळिंब, पपई, चक्री (पांढर्या फुलांचे झाड याला विदर्भात चक्री म्हणतात). पण तो संबंध केवळ तिच्या घरी जाण्यापूरता होता. सातवी आठवीत असताना स्वतःच्या घरात राहायला गेल्यावर मात्र बागकामाचे बाळकडू वडीलांकडून मिळायला लागले. सुरुवात झाली ती बोगनवेलीपासून. घराला भलामोठा गोलाकार पोर्च(व्हरांडा) होता.या पोर्चवर बोगनवेल खूप छान बहरली. सोबतीला काही गुलाब, कुंदा, चमेली सुद्धा लावलेत.

मोहिम-ए-संपादक

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 22/09/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.

Now she does not bite…!

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 21/09/2016 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख अनाहितामधे पूर्वप्रकाशित आहे आणि तिथले काही उल्लेखनीय उत्तम साहित्य ज्यात कोणतेही वैयक्तिक संदर्भ नसतील असे यापुढे नियमितपणे लेखिकांच्या परवानगीने मिपावर सर्वांसाठी खुले करू. - अनाहिता) ------------------------------------ (आमची प्रेरणा) मागच्या महिन्यात आमच्या घरी मोठाच फंडा झाला.. नाही हो, माझा अन माझ्या नवऱ्याचा नव्हे, तिचा अन तिच्या पिल्लांचा ! सगळा घोळ माझ्या झाडांच्या हौशीमुळे झाला असं नवऱ्याचं म्हणणं.

तीन दिवस दोन रात्री : भाग १

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुभव खरा, नावे खोटी) त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

कावेलोसिम - स्वप्नातले गांव

लेखक गणामास्तर यांनी बुधवार, 14/09/2016 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं. प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते.

पुणेकरांचा मिपा च्या वर्धापन निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 11/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच हाती आलेल्या माहित नुसार मिपाच्या 10 वर्षे झाल्यामुळे अनेक पुणेकरांनी आर्जवून अभिमानदं केले ठराविक मासले खाली प्रमाणे 1) आमचे दुकान 2-4 बंद असते तसेच मिपा पण दुपारी बंद असते ,ह्यामुळे बंधुभाव वाढतो ,वर्धापन दीना निमित्त पेढे आमचंच दुकानांतून घ्या - चितळे 2) फक्त 10 ?

मजबूर मजदूर महासंघ

लेखक शरद यांनी मंगळवार, 06/09/2016 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
मजबूर मजदूर महासंघ मित्र हो. आमच्या पुण्यात जरा आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. माझ्या मित्रांच्या बायकांनी ( ऑ करून बघू नका, प्रत्येकाला एकच बायको आहे, आहे तीच पुरेशी आहे !) Great Friends नावाचा एक ग्रुप केला आहे ( माझा एक गरीब बिचारा मित्र त्याला Great Fiends म्हणतो ते सोडा ). व्हॉट्स अप वर जोरजोराने मेसेजेस पाठवले जात आहेत. आता पर्यंत घरातच काढले जाणारे आमचे वाभाडे आता काही सेकंदात पंचवीस घरात पोचत आहेत.

उथळ

लेखक तिमा यांनी सोमवार, 05/09/2016 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !
काव्यरस