लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात.
तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली.