Skip to main content

मौजमजा

विडंबनाच्या चर्चेवर विडंबन... मद्यविरहित

लेखक तळीराम यांनी शुक्रवार, 28/03/2008 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला चतुरंग मी, मी प्राजू ती सुशील, लाडू, खेचर येती नाव भिन्न परी एकच यु(क्)ती मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला घाला बंदी ! नको विडंबन मद्याचे तर नकोच चिंतन मिसळ खाऊ या कांद्यावाचून सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला

गंमत

लेखक सचिन यांनी बुधवार, 26/03/2008 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला असेच आलेले ढकल निरोप ... तुम्हांपैकी कित्येकांनी वाचलेही असतील...आणि काहींनी नसतीलही ... १. आयुष्यात आपण कधी ना कधी हे प्रश्न स्वतःला विचारलेच पाहिजेत : आपण कोण आहोत ? कोठून आलो आहोत ? कोठे निघलो आहोत ? आणि जेंव्हा तिठे पोहोचू, तेंव्हा ...तिथले... बार उघडे असतील का ...? २. जो एकटा पितो तो नरकलोकात जातो जो दोस्तांबरोबर पितो तो स्वर्गलोकात जातो आणि...जो पीतच नाही तो...तो..."जसलोकात" जातो...! ३.

मी नाही अभ्यास केला

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 25/03/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.
Taxonomy upgrade extras

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/02/2008 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

लेखाचा झटपट अभ्यास

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 24/02/2008 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट न्याहारी या सृष्टीलावण्य यांनी लिहिलेल्या लेखात बेकरीमधील 'बटर'पासून दहीवडे तयार करण्याची कल्पक अशी पाककृती दिली आहे. त्या लेखावर आलेल्या उदंड प्रतिक्रिया 'झटपट' वाचतांना खूप गंमत वाटली. मुख्य मुद्दा सोडून दूर भटकत जाण्याच्या मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले. हा धागा असाच सुरू राहिला तर तैमूरलंगाच्या स्वारीपासून भटकरांच्या महासंगणकापर्यंत कुठेही आपण पोचू. 'सुताने स्वर्गाला जाणे' असा वाक्प्रचार आहे, पण तेवढी घाई बहुतेक कोणाला नसावी. अजून पोटभर मिसळपाव खायची आहे ना? त्या लेखावर मी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहेच.

शाळेतील गमती जमती

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 21/02/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतील गमती जमती.... यामध्ये आपण शाळेत केलेल्या गमती किंवा स्वतःवर ओढवलेले विनोदी/आठवणीत राहिलेले असे प्रसंग लिहावेत. तसेच लक्षात राहिलेले शि़क्षक/ शिक्षिका..... यावर एक मेल द्वारे आलेली कविता मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय............. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

ईस्ट कोस्ट स्पेश्शल!!!!

लेखक वरदा यांनी गुरुवार, 21/02/2008 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी, प्राजु, धनंजय आणि मुक्तसुनीत एवढे जमलो अजुन कोण कोण आहे? न्यूजर्सी ला जमूयात माझ्या घरीही हरकत नाही..किंवा हॉटेलही भरपूर आहेत....बोला कधी जमूयात? एप्रिलच्या आसपास म्हणाल तर माझ्याकडे या बार्बेक्यू करु....विंटर मधे किती जणांना जमेल माहीत नाही....