Skip to main content

मौजमजा

वाघाची मावशी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 15/05/2008 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
बाल कविता वाघाची मावशी वाघाची मावशी, ए मनी मावशी वाघाला आण ना घरी एके दिवशी तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! मग कुठे? लांबलांबच्या तिथे तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात! जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती? छे रे बाळा! आता मी थकले आहे किती? उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत? तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी? म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी शर्थ झाली बाई!
Taxonomy upgrade extras

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 13/05/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो. तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते....

रंगपंचमी (उत्तरार्ध)

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 13/05/2008 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र व घटना काल्पनीक) रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच. इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

लेखक बट्ट्याबोळ यांनी सोमवार, 12/05/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र आणि घटना काल्पनीक.) योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली. मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता.

अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 09/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्‍यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे. रुपरेखा खालील प्रमाणे, ०९.०० सकाळी शांतेचं कार्ट. १२.३० ला मोरुची मावशी ०४.०० वाजता औपचारिक समारंभ ०५.०० वा तो मी नव्हेच ०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्‍या सत्रात, तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 07/05/2008 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात. साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही . आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार. साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?" छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या (चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं.

स्वय॑पाक घरातील घडामोडी

लेखक शितल यांनी बुधवार, 30/04/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान ! माझी तर फजिती ही होतेच होते.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 27/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

तुमचा पासवर्ड चेंज करा ....

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 24/04/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ... आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ... किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी.

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/04/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!