Skip to main content

मांडणी

जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना.

आईचा मुलगा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 08/06/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

(येकदम) स्मार्ट पुणे

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 03/06/2018 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आहे सध्या पुण्यांत चालू असलेल्या " Smart City" मोहिमेच्या एका भागाची - शितावरून भाताची परीक्षा होईलच! पुणे (आधीच "स्मार्ट" असले तरी "Smart City" मोहिमेखाली आणखी जास्त) "स्मार्ट" करण्याच्या प्रयत्नातली पहिली/प्रायोगिक पायरी (Pilot Project) म्हणून परिहार चौक, औंध, पुणे याच्या आजूबाजूचा काही भाग/रस्ता "Smart" करणे काही काळ चालू आहे.

स्वप्न

लेखक अभिजित कुमावत यांनी गुरुवार, 31/05/2018 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
जागेपणि बघतो ती वेगळी अणि झोपेत बघतो ती वेगळी. खरच स्वप्नांची दुनिया काही औरच. जागेपणि जी स्वप्न बघतो ती शक्यतो आपल्या भविष्याला धरून असतात. आणि दिवासभरच्या घडामोडी वर अवलंबून असतात अशी काही झोपेतली स्वप्न जी सन्दर्भ विरहित असतात. माणूस जन्माला येतो तेहि स्वप्नवतच आहेना. नऊ महीने आपली माता आपणास स्वताच्या गर्भात वाढवते. ती आणि आपले वडील त्या गर्भाला विचारात घेऊन स्वप्न बघतात. मूल झाल्यावर ते अस वगेल तस वगेल. पण तेच मूल मोठ झाल्यावर आपल्या स्वप्नात रंगून जात.आणि आपण आपल्या जन्मदात्यांना काहीतरी देण लागतो हे विसरून जात. जन्माला आल्यापासूनच जणू परीक्षा चालू होते.

आंजा-टोळ

लेखक चामुंडराय यांनी सोमवार, 28/05/2018 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.

स्वैपाकघरातून पत्रे २

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/05/2018 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 22/05/2018 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन.... 1 मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो... त्यातला एक किस्सा सादर... ...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला.

अन्नदाता सुखी भव भाग ९ : आहे का सुंदर हा चॉकलेटचा बंगला?

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 20/05/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

स्वैपाकघरातून पत्रे १

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 19/05/2018 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नपूर्णा, (तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.) आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची! आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी!

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.