Skip to main content

काय सांगू नवलाई

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 30/12/2007 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
या कविता मी संकलित केलेल्या असून मूळ कविची माहिती कवितेच्या खाली देण्यात आली आहे. काय सांगू नवलाई बाई,जाहले उन्मन उतरता पाण्यामध्ये लाज गेलीच वाहून. आता पदराशी माझ्या वारा करी हितगुज वेळी अवेळी वाजते मनामधे अलगुज. घर राहिले पाठीशी तुटे संसार पुरता काठावर यावे सांग सखे,कुणा ग करिता! कविता संग्रहः शब्द मनातले कवि: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमुख
लेखनविषय:

वाचने 2668
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान आहे कविता. (तुम्ही सांगितल्यानंतर सर्व कडव्यांची जुळणी कळली. काय करणार? अस्मादिक अजुनही कविता प्रकाराच्या क वरच आहेत. :) )