कविता
रासलीला
लाख चांदण्या लखलख करीती
आणि तारका दळे उतरती
आज पोर्णिमा उतरुन आलि
कालिंदीच्या तटी
खेळतो रास सखा श्रीहरी
भरल्या मेघा परि सावळा
मोरमुकुट शिरी मदनची दुसरा
श्रृंगाराला स्वरात भिजवी
अधरी धरुनी बासरी
खेळतो रास सखा श्रीहरी
गोप गोपिका जमले सारे
टिपरी वरती टिपरी गाजे
त्या नादाला भूलूनी आले
शिवही यमुनातिरी
खेळतो रास सखा श्रीहरी
वाळ्वंटी त्या यमुनाकाठी
रास रंगता हरी संगती
तनमन अवघे विसरुन जावे
प्रेम भरूनिया उरी
खेळतो रास सखा श्रीहरी
विषय नव्हे हा ही तर भक्ती
विसरूनी रमणे देहासक्ती
देवांनाही वेड लावते
अशी रासमाधुरी
खेळतो रास सखा श्रीहरी
Taxonomy upgrade extras
((प्रवाह..आणि उत्तर))
प्राजूची "प्रवाह..आणि उत्तर" वाचली आणि लगोलग विडंबनाचे प्रवाही उत्तर स्फुरले ते असे..
काव्य अनावृत्त
मात्रा आणि वृत्त
शिष्य हा प्रवृत्त
झाला पहा
कविबुद्धी नाठी
हाणावीच काठी
विडंबना साठी
लगोलग
'धुकट सकाळ'
फुकता 'फुकट'
'चिकट' बिकट'
होत जाई
तोतयांचे बंड
विचारती गुंड
'चतुरंग' पुंड
गेला कोठे?
कविता 'म्हणजे'
वाघाचे हो पंजे
कशाला पाहिजे
वृत्त छंद
विसरा 'खोबार'
'शाळा' झाली फार
प्यावा थंडगार
सोमरस
काव्य 'हलकट'
करी खटपट
नाना पाठोपाठ
अवलिया
आवडती नार
आहे 'बुधवार'
टाकावी चिक्कार
सायंकाळी
कवी किती जण?
कवितांचे तण
उपटण्या मन
आतुरले
'केसूपंथी' खाज
व
प्रवाह..आणि उत्तर
शिकवीत वृत्त
झाला तो निवृत्त
फिरूनी प्रवृत्त
विडंबना
आणली ती लाट
सोडूनिया काठ
सारे पाठोपाठ
धावतात
'धुकट सकाळ'
कधी ती 'फुकट'
अन ती 'चिकट'
होत राही
डांबिस लेखणी
लिहूनी 'कोकणी'
जाई विडंबनी
हात धुण्या
"म्हणजे' ते काय
कोणी ते सांगावे
कितिदा लिहावे
मोज नाही..
विसरा 'खोबार'
लेखणीची धार
होऊनी सुमार
बोथट का?
Taxonomy upgrade extras
आलो शरण तुला...
आलो शरण तुला...
कितीक प्रमाद घडले माझे
मार्ग दाखवी खरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
तुझी कृपा नर जन्मी घातले,
सुख दु:खाचे दिवस दाविले.
क्रुतघ्न मी पण तुला विस्मरे,
क्षमा करी लेकरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
संसाराचे पाश तोडता,
इथे मोहवी विकारवशता.
मन गुंतावे चरणी तुझीया,
लोभ सरावा पुरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
उदासीनता मनास व्यापी,
रुदन येतसे पश्चातापी.
भवपन्थातुनी मला सोडवी,
करूनी अवघी त्वरा.
आलो शरण तुला ईश्वरा...
Taxonomy upgrade extras
लावणी-प्रणयरातीला कुठ चालला
रात चांदण टिपूर सांडल
वार्याचा बी साज नवा
प्रणयरातीला कुठ चालला
शृंगाराला सोडून या
नथनी पैंजण दूर ठेवल
कशास त्यांची भीड उगा
प्रणयाच्या या साजापुढती
सोन्याचाही साज फिका
हाती माझ्या हात सख्याचा
अन् फुललेली रात हवी
नभांगणातील लाख चांदणी
प्रीत बघुनी जळल मनी
प्रेमामध्ये हवी सहजता
शृंगारातही लाज हवी
अस सामोर जाव रातीला
रोजच व्हावी रात नवी
Taxonomy upgrade extras
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
गुंजन करण्या का कष्ट विहंग घेई
ही समस्या सदैव माझ्या मनी येई
गीत लिहूनी कवी ते गाण्या देई
सप्तसूरातून गायिका मग गान गाई
कवनासाठी कोण बरे विहंगाचा कवी
अपुले कवन सहजगत्या तो गाई
प्रीति कशी एकमेकावरी करावी
गाऊनी गाणे तेच विहंग शिकवी
अपुली प्रीति सहजगत्या व्हावी
हीच कामना कवनातूनी मिळावी
श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
(( म्हणजे ))
"ओढ" म्हणजे काय ते
१ आयडी उडवल्यावर लगेच दुसरा काढल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
आपला आयपी ब्लॉक केला गेल्याशिवाय समजत नाही.
"गेम" म्हणजे काय ते
हिट्स वाढवुन सर्व्हरवर ताण आणल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
तरीसुद्धा संकेतस्थळ चालु असल्याचे पाहिल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
दिवसातुन एकदातरी आंतरजालावर गजाल्या केल्याशिवाय समजत नाही.
आधारीत : - म्हणजे आणि (म्हणजे)
वास्तविक पाहता काव
Taxonomy upgrade extras
तू यावेस
तू यावेस
प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात
तळपत्या तेजस्वी सुर्यासारख॑ ,
शितल शान्त चन्द्रासारख॑ !
प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात
हळूवार स्वप्नासारख॑ ,
सकाळच्या कोवळ्या ऊन्हासारख॑ !
प्रिया तू यावेस माझ्या आयुश्यात
खळाळत्या निर्मळ झरयासारख॑ ,
विराण वाळव॑टात श्रावणासारख !
प्रिया तू र॑गवावेस माझ्या आयुश्यास
एखादया सु॑दर चित्रासारख॑ ,
प्रिया तू ऊजळवावेस माझ्या आयुश्यास
मन्दिरातल्या दिपासारख॑ !
तू रहावेस माझ्या आयुश्यात रेशीम बन्धासारख॑
तू रहावेस माझ्या ह्रुदयात स्पन्दनासारख॑
(म्हणजे)
"ओढ" म्हणजे काय ते
जोर लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
माहेरी गेल्याशिवाय समजत नाही.
"गेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
सासरी आल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
दिवटी झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
विडंबन केल्याशिवाय समजत नाही.
आधारीतः म्हणजे
Taxonomy upgrade extras
मिसळपाव