Skip to main content

कविता

-गणेश स्तवन-

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 12/02/2009 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश -स्तवन गणेश माझा आहे सुन्दर कटी तयाच्या शुभ्र पीतांबर प्रभा तयाची दशदिशांवरी नभी उगवला वाटे दिनकर ! कटी मेखला नागांची ही डोक्यावर्ती जुडी दुर्वांची आहे गणेश मोहक माझा हाती मोदक त्याच्या शंभर! दुखे हरतो भक्ताची हा आहे गणेश माझा सुखकर पुजिती त्याला देवही सगळे आणी मराठी हा जनसागर ! -अनिरुद्ध-
Taxonomy upgrade extras

कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 11/02/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल. कशी येशील कोंदणी??... तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा? पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे? लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी तुझे हासणे ते 'मंद',

कधी येशील कोंदणी??... (खास व्हॅलेंटाईन डे साठी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 11/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! :) कधी येशील कोंदणी??...
Taxonomy upgrade extras

सजनासाठी...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 11/02/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
सजनासाठी... एक अलबेली नार केला सोळा शिनगार. नववधूचा साज ती ल्यालि आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" काळे भोर तिचे डोळे मुखमंडल ते भोळे. नाजूक ती ओठांमधे हसली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" मेघमयी तिचे केस झाले मर्यादेची वेस. काया चांदण्यात पहा तिची न्हाली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली" ल्यालि आकाशाची शाल सूर्य चुंबी तिचे भाळ. श्रावणातल्या धरेसारखी सजली. आज काय असे खास? असे विचारता बोले "माझ्या सजनासाठी मी सजली"

सुख पुढे वाटे....

लेखक संध्यानंदन यांनी मंगळवार, 10/02/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर, काटेरी फणसात गरे रसाळ मधुर, दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा, ऊस असे कठीन पण रस वाटे बरा, झाड उभे उन्हात पण सावली का गार ? प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार, घाव घातल्यावर
Taxonomy upgrade extras

खलील जिब्रान हे आपल्या विषयी तर नाही ना म्हणाला?

लेखक मोगॅम्बो यांनी मंगळवार, 10/02/2009 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
कीव करा त्या देशाची, जो तुकड्या तुकड्यात वाटला गेलाय आणि प्रत्येक तुकडा स्वत:ला एक स्वतंत्र देश समजतोय. कीव करा त्या देशाची, जो धटिंगणाला आपला हीरो समजतो आणि त्याचीच संपत्ती लुटून त्याच्यावरच चार तुकड्यांची खैरात फेकणा-या आक्रमकाला दानशूर मानतो. कीव करा त्या देशाची, ज्याचे मुत्सद्दी हे कोल्हे आहेत, तत्वचिंतक हे हातचलाखीचा खेळ करणारे मदारी (juggler) आहेत आणि ठिगळे लावून जोडजाड करणे व पोपटपंची करणे ही ज्या देशाची कला आहे. कीव करा त्या देशाची, जो उगवत्या नेत्याचे तुता-या वाजवून स्वागत करतो.

आनंद शोधतांना..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 10/02/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना.. तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे! आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा.. तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे.. येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई" तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे.. आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी? मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे.. आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी.
Taxonomy upgrade extras

गाव...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 10/02/2009 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेबद्दल थोडंसं काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं.
Taxonomy upgrade extras

(गंधांच्या उलाढाली)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/02/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा भूषण कटककर ह्यांची गजल 'गंधांच्या उलाढाली' जरा 'टाकून' बसलो तर बला कळवायला आली तिच्या पक्षातल्या आंबूस गंधांच्या उलाढाली! तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली! इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली! मिळावे रातच्याला हरितकी अन ऊन पाणीही तसा मी उगवता वदतो, चला झाली, चला झाली! गमन करण्या निघालो मी, हिच्यापाशी कसा आलो? बरे नाही मिळाले पद्य की मी वाकडा चाली! पुरेसे मोडके केव्हाच झाले गीत हे बाळा करावी वाटता, गझलेस 'रंग्या' मोडता घाली! चतुरंग