Skip to main content

कविता

कशी कोण जाणे

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शनिवार, 21/02/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कोण जाणे, तुझी याद आली मुक्या पापणीतून ओलावलेली आवर्जून मी एकेका सयीला कुलुपबंद केले मनाच्या तळाला वरी विस्मॄतीचा दगड रोवलेला तरीही...... ......तरीही पुन्हा आज डोकावलेली कशी कोण जाणे...... आवरून अवघे वेदनांचे भारे किती निग्रहाने लिंपलेले सारे तडे, चरे अन दुभंगलेले तारे तरीही...... ......तरीही पुन्हा भेग रुंदावलेली कशी कोण जाणे...... ना जाणे कुठे तू, कुणाच्या कुशीत जुनी कात टाकून, निराळ्या मुशीत अता गाठभेट, आहे स्वप्नातीत तरीही...... ......तरीही पुन्हा प्रीत आसावलेली कशी कोण जाणे......
Taxonomy upgrade extras

आतुर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/02/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
जागली रात्र हिरवी सांज कोवळी लाजली झोपला गं दिनमणी चंद्रकला हि फाकली गुज काजवे करती क्षितिजाही सैलावली धुंदी तव लोचनी गात्रे सारी मस्तावली चाहुल तुझी सजणी रातराणी धुंदावली प्राजक्त गातो अंगाई बघ पश्चिमा उजळली सखे रात ही जागवु चल तनुत आगळी नको आता दिरंगाई नीज नयनी जागली विशाल
Taxonomy upgrade extras

वेणू

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 20/02/2009 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
चोरून पावा, वरी कांगावा नाही लागली हाती तुच शोध की, तुझी लाडकी शोधू कशा मी सवती सावळ रंगी बावळी राधा भांडत बसली कॄष्णाशी दिड दमडीची, नळी बांबूची सोड तिला, बोल माझ्याशी माझ्या कृष्णा रं, माझ्या कान्हा रं निर्जीव तरी, द्वाड खरी पिडते सार्‍या वृंदावना ओठासंगे, जेव्हा लागे लबाड, वेड लावी मना रोज कटीला घेऊन फिरशी लळा तिचा का इतका तुला गोप गोपिका, झुरती फुका चिंता कशी ना त्यांची तुला माझ्या कृष्णा रं, माझ्या कान्हा रं बैस समोरी, कधी मुरारी तुला पाहू दे शुद्धीत नकोच अडसर, कुठला कणभर रंगू सावळ्या धूंदीत तुझ्या भक्तीने भरली घागर उतू जाऊ दे डोळ्यातून काया वेणू, झाली जणू सूर प्रीतीचे ओथंबून माझ्या कृष
Taxonomy upgrade extras

ते पण एक वय असतं

लेखक ashwin joshi यांनी शुक्रवार, 20/02/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ते पण एक वय असतं दिवसभ पाळण्यात झोपायचं सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं ते पण एक वय असतं हाफ चड्डीत गावभर फिरायचं आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं ते पण एक वय असतं मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं ते पण एक वय असतं घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं ते पण एक वय असतं तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं ते पण एक वय असतं आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं पॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं ते पण एक वय असतं लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठ

पहाट

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 20/02/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नहाली दवाच्या कुशीत रात्र विरघळे रेशमी मिठीत.. झाले बघ दूर झुन्जुर्-मुंजुर दूर जाणे तरी तुला ना मंजूर.. निरोप घेई रे एकेक चांदणी तरी ही सुखाने जडावे पापणी.. किरणे नाजुक सोनपावली स्वप्नांची रात्र तरी ना सरली... मिठीत तुझ्या मी तुझीच होवून पहाट उमले प्राजक्त होउन
Taxonomy upgrade extras

महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते |

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 19/02/2009 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिव जयन्ती निमित्त - बहुत यवन पीडिती स्वधर्माते, महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | मांडुनी मोडिली क्षेत्रे..... विरश्रिये संचविली, गलितही गात्रे | उभविले स्वराज्य भगव्द्ध्वजाते, महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | शिवबा दे अम्हा झगडण्यास स्फूर्ती, उखडूच ते हात जे फोडिती मूर्ती | धर्मरण स्थंडील अता हे धगधगते , महाराज.., शिवछत्रपती अवतरले त्राते | छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !! ---- सागर लहरी
Taxonomy upgrade extras

मी गेल्यावर वि़झुनी जातील--

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 19/02/2009 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्या नाव इथे होणार गेल्यानंतर दोन अश्रुही कोण तुला देणार
Taxonomy upgrade extras

राधा ही बावरी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/02/2009 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
तु पांघरशी नभ निळे मज मोहवे वदन सावळे खुळावले नयन जुळे सख्या न माझे मला आकळे लट भाळी केश कुरळे पाहुनी ते मम चित्तही चळे तुज पाहता अहं गळे पान्हावली मुरली खुण कळे यमुनातीरी आनंदमेळे वृंदावन झाले आज बावळे शाम सावळा रास खेळे कामधेनु सोडी मुक्त आचळे जाती घटिका आणि पळे कालपाश अन कंठी आवळे नाम तुझे मनी सावळे हवा कशाला तो स्वर्ग ना कळे विशाल कुलकर्णी
Taxonomy upgrade extras

तु म्हणजे....

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
तु म्हणजे... तु म्हणजे... सकाळचं गवतावरलं दव सुंदर.. तु म्हणजे... खळाळत्या समुद्रातला नितळ कातळ.. तु म्हणजे... रणरणत्या वाळवंटातले थंडगार मरुस्थळ.. तु म्हणजे... देवासमोर लावलेला दिवा प्रांजळ.. ही कविता कॉलेज मधे असताना लिहिलेली आहे . प्रथमच सार्वजनीक रीत्या प्रकाशित...

(आड गल्लीतल्या काही कविता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 17/02/2009 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं हल्ली असंच होतं, रामदास ह्यांचं काही लिखाण वाचलं की मी अस्वस्थ होतो. रामदास ह्यांच्या 'अडगळीतल्या काही कविता' ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या कवितांवर 'वा!