मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(फुकट सकाळ)

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र) फुकट सकाळ *** कुठे कोण पडले पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा फक्त पेले रिकामे रिकामे *** नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या (नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!) अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत निघाले धुराचे किती लोट होते फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी *** आधारीतः धुकट सकाळ

वाचने 3133 वाचनखूण प्रतिक्रिया 9

धनंजय 03/02/2009 - 00:59
मस्तच! (नसत्या धुराच्या लोटांना बघून घाबरा झालात की धुराच्या लोटांमुळे जीव कासावीस झाला?)

चतुरंग 03/02/2009 - 01:03
(खुद के साथ बातां : रंग्या, द्राक्षासवाच्या उल्लेखाने कसं अगदी ओळखीचं वाटतंय ना विडंबन? ;) ) चतुरंग

सुनील 03/02/2009 - 08:40
बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झेल्या 03/02/2009 - 11:34
अवांतरः राजकारण समाजकारण क्रीडाविश्व 'घडा''घडा' व्यक्त केलेले विचार राशीभविष्य दिनविशेष चिंटू बालमित्र सप्तरंग (चतुरंग यांची आठवण झाली) मुक्तपीठ फ्यामिली डॉक्टर 'सकाळ' फुकट कधीच येत नाही साडेतीन रुपये पडतात :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

प्राजु 03/02/2009 - 23:19
बेला... खूप दिसांनी दिसलात. खूप बरं वाटलं. मस्त विडंबन.. आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/