क्षुल्लक
सागराच्या सामर्थी
थेंबा-थेंबाची उसळण,
थेंबाच्या बळावर
महासागराचे विशालपण !
घराच्या बळकटपणी
पायाचं खोल रुतणं,
सजिव, निर्जिव भार पेलत
घराचं छप्परही सजलेलं
चंदनाचे महानपणी
सहाणेचं झिजणं,
उगाळताना खड्डा सोसून
चंदनाचे गुणं टिकवलेलं !
क्षुल्लक गोष्टीतही
विसावलं थोरपण,
थोरपण जपण्यासाठी
जपाव जाणिवेचं उदारपण !
Taxonomy upgrade extras
मिसळपाव