Skip to main content

देणं-घेणं

देणं-घेणं

लेखक जागु
Published on गुरुवार, 30/04/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
गोष्टी - गोष्टीचा व्यवहार, जागोजागी चालतो बाजार ! देणे-घेणे सॄष्टीचा नियम, फळासाठीही ,लागतो संयम! पाहण्यासाठी लागते नजर, प्रश्नालाही लागते उत्तर ! दाम मिळाले तरच काम, आळसासाठी ही ,लागते बेकाम ! देता ओलावा फुटेल अंकुर, अंधार मिळताच, चांदणे टिपूर ! घेण्यासाठी द्यावा लागतो श्वास, अन्यथा मिळतो, यमपुरी वास !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

याद्या 2675
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जागु, तुमच्या कविता नेहमीप्रमाणे वर्तमानात राहायला शिकवतात. छान आशय! हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

देता ओलावा फुटेल अंकुर, अंधार मिळताच, चांदणे टिपूर ! मस्तं कविता, वरच्या ओळी विशेष आवडल्या. -अनामिक

देता ओलावा फुटेल अंकुर, अंधार मिळताच, चांदणे टिपूर ! मलाही याच दोन ओळी जास्त आवडल्या. कविता नेहमीप्रमाणेच मस्तच! :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

देता ओलावा फुटेल अंकुर, अंधार मिळताच, चांदणे टिपूर ! ही ओळ जास्ती आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

व्यवहारी जगाच वास्तव नेमक्या शब्दात मांडलं आहे . कविता आवडली.

सुंदर कविता..

अनंता, अनामिक, क्रांती, प्राजू,गोखले, बेसनलाडू, उमेश तुमचे खुप खुप धन्यवाद. ४ दिवस नसल्यामुळे आभार मानायचे राहून गेले. परत एकदा धन्यवाद.

जागु ताई कविता फार आवडली. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.