Skip to main content

कविता

दुष्काळ

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/04/2009 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
अधीर आर्त स्वरांनी पुसते धरा नभाला तो गंध तुझ्या स्मृतींचा सख्या कुठे निमाला... प्रीतीत रंगलेला कणा-कणात रुजलेला अपुल्या मधु-मिलनाचा मृदगंध कुठे हरवला... आठवते अजुनी भेट तुझी सौख्याची त्या भेटीत गुंफलेला स्नेहबंध कुठे गळाला... स्खलित जाहले पतिव्रता जरी मी मनात गुंतलेला तो स्पर्ष कुठे निमाला... व्याकुळ धरणी वरुणासाठी कृषक, पुत्र तिचा तोही पुसतसे वरदहस्त प्रभो, तव तो कुठे हरवला... विशाल

सेंटेड प्रेम..

लेखक jenie यांनी गुरुवार, 23/04/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
सहज एक विरंगुळा म्हणून आणि आज कालची मूलं कशी विचार करतात या साठी ही कविता ...कवितेची सुरवात मी करते तुम्हाला काही सुचते का ते सांगा... पूर्ण आपण करुयात... रोज रोज तुला गुलाबाचे फुल द्यायला एक रुपाया भार पडतो माझ्या खिशाला रोज रोज भेळ -पुरी खायला लाज नाही वाटत मनाला?? काय होत तुला डबा घरुन आणायला??? रोज रोज फिरायला रि़क्षा लागते तुला थोडं फार चालताना काय पाय लागतात दुखायला दर महिन्याला तुला ड्रेस द्यायला काय बापाची जहागीरी समजते मला?? ------------- ----------- ------- -----
Taxonomy upgrade extras

तू!

लेखक उमेश कोठीकर यांनी गुरुवार, 23/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुझेच नाव स्वप्नांच्या ओठी "तू"च निघे मोती शब्दांच्या पोटी निळ्या या नभात भासे तुझे रूप पृथ्वी सर्व वाटे तुझेच स्वरूप! दिसे फक्त तूच नेत्री येई पाणी ऐकू येते फक्त नाव तुझे कानी आरशात तूच दिसते साकार एकांतही घेतो तुझाच आकार! तळ्यात चंद्र तुझेच बिंब फुलांत तूच दवाने चिंब होउनी श्वास जाई तू आत स्पंदते नित्य तू हृदयात मंदिरी मूर्तीत हसते तूच कणीकणी माझ्या वसते तूच!
Taxonomy upgrade extras

जांभुळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 22/04/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात माझ्या उभे जांभळाचे झाड एक त्याचे माझे नाते असे जणू बाप आणि लेक त्याच्या मायेची सावली घरावर माझ्या असे त्याच्या वा-याची झुळुक अंगावरी मोरपीसे त्याच्या फांदीवर किती नाना पाखरांची वस्ती राघु मैना चिऊ काऊ गुण्यागोविंदाने रहाती फांदीवरी चोच घासी काळा कावळा तो-यात चुळबुळ चिमण्यांची गोड त्यांचा चिवचिवाट झर झर खारुताई खालीवरी जात राही तिची लगबग बघता खुदूखुदू हासु येई झाड जेव्हा जांभुळते मन माझे उल्हासते निळी टप्पोर जाभुळे फांदीफांदी बहरते गोड गोड जांभळांचा टप्प टप्प सडा पडे सान थोर वेचिताती णिळ्या मोतियांचे सडे परी, पाउस येण्याआधी त्याच्या फांद्या छाटताती

न्याय दे !

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय दे, देवा न्याय दे, स्वर्गाचं उघडून तू दार ये ! गरीब मरतो उपाशी पोटी, धनिक राबतो प्रतिष्ठेसाठी ! तुझी प्रतिष्टा कायम राहू दे, गरीबाच्या पोटाचाही मान राहू दे ! न्याय दे ,देवा न्याय दे, कणा कणात जन्मून तू धाव घे ! अत्याचार मुरलाय जागोजागी, प्रामाणिक मुखवटा चेहर्‍यावरती ! तू आहेस प्रामाणिक दाखवून दे, सज्जनपणाला आता वाव दे ! न्याय दे, देवा न्याय दे, देव्हार्‍याचे माप ओलांडून ये ! लुटारुंच्या घरात सोन्याचा देव, लुटलेला मांडतो नवसाचा खेळ ! नवसाच्या खेळाला न्याय दे, न्यायदेवतेच्या डोळ्यांना
Taxonomy upgrade extras

झाड

लेखक स्वामि यांनी मंगळवार, 21/04/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड त्याला कर्जाचं पाणी टाकून, वाढवत होतो हळूहळू. खूप निघत होता व्याजाचा घाम चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी वाट बघत होतो अशा एका पावसाची ज्याने ओसंडून वाहील पण होत नाहीत अशा गोष्टी अचानक झाडाला पालवी फुटली तरारुन वाढलं एवढं की मला झोप येइना बंद केलं ठिबक सिंचन बास झाला घाम आता फक्त आराम आणि तेवढ्यात ती आली मंदीची साथ अगदीच अनोळखी रोग झाड कोमेजलं होत्याचं नव्हतं झालं सगळं पाणी वाया गेलं आता पुन्हा हिंमत नाही ते झाड ते पाणी आणि ते ठिबक सिंचन.
Taxonomy upgrade extras

या गर्द नील नयनी... दाटुन मेघ आले...

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 21/04/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
या गर्द नील नयनी... ! काही दिवसांपुर्वी प्राजु ने एक कविता पुर्ण करायला सांगितली होती.. मला त्यावर जे सुचले ते मी लिहीलेय.. या गर्द नील नयनी.. दाटून मेघ आले.. का मोर पापण्यांचे.. मिटवून पंख बसले... क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी.. परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले.. [१] सखये स्मृतीत तुझिया.. बावरा भ्रमर मी झालो.. भिरभिरलो तुज शोधाया.. विरहात श्वास तुटले.. [२] हा मंद धुंद वारा.. अन गंधीत रातराणी... हा चंद्र हेच तारे... मज छळावयास उरले... [३] व्याकुळल्या मनाला... आता तुझीच आस... ओठी तुझेच नांव.... चित्ती तुलाच स्मरले...
Taxonomy upgrade extras

आलो होतो ! (स्फुटिका)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 21/04/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कुणीच्या (कुणा मुलीच्या ;) ) खिडकीबाहेर चुरगाळलेल्या कागदावर ही कविता मिळाली.
दुपारी घरी कुणी नसेल नक्की ये ! म्हणालीस. आलो होतो. तू सुद्धा नव्हतीस ! काय हे !
जुन्या विनोदाला फाउंड कवितेचा मुलामा. --लिखाळ.
Taxonomy upgrade extras

अनोळखी काळ

लेखक जागु यांनी मंगळवार, 21/04/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द होते मी तेंव्हा, कवयत्रीही नव्हतें, प्रतिसादाला तुझे उत्तरही नव्हतें ! भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! अनोळखी धुक्यातून वाट शोधत होते, काळाच्या लहरींवर आशेची साथ देत होते ! प्रेम मिळत होते तुझे पण माझेच म्हणून खासही नव्हतें, चार चौघांचे प्रेम पाहून माझे मन जळत होते ! पण धुके आता सरले आहे आशेने साथ निभावली आहे भावनांनी दाटलेल्या थव्यांनी भरारी घेतली आहे शब्द सारे कविता गुंफत आहेत प्रेम काव्य मिच आता रचत आहे कवितेला माझ्या तुझा प्रतिसाद मिळत आहे मी तुझ्यासाठी आता खासच आहे माझे प्रेम चारचौघांपेक्षा हटकेच आहे अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य
Taxonomy upgrade extras

((बेत आहे..!))

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/04/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्‍यांचे...;) आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे. आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे. भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे! टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे? रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?