Skip to main content

कविता

कशाला?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 28/04/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला? नि:शब्द भावनांचे इमले फुका कशाला? नसतेच अमृताची गोडी कधी विषाला या भाबड्या जिवाला केलेस तू निराश ऐश्वर्य अन् सुखाची सुरई तुझ्या उषाला ! जाणून घेतले कां कधी सांग प्रेम माझे? नांदीशिवाय सांग , ही सांगता कशाला? काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला? हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला? कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी? शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला? जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला? ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !
Taxonomy upgrade extras

जीवन...!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे झुळझुळणारा खळखळणारा झरा जीवन म्हणजे मोर नाचरा फुलवून पंखपिसारा जीवन म्हणजे मंजुळ मंजुळ ऐकवं कोकीळ गाण जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे हिरव्या हिरव्या पानांची हो सळसळ जीवन म्हणजे शितल शितल वा-याची हो झुळझुळ चैत्रबनात येउन घाली नवथर सृष्टीला शीळ जीवन म्हणजे मोकळ्या आकाशी सांडल ट्प्पोर चांदणं जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण जीवन म्हणजे उचंबळुन वाहणारी अल्लड नदी म्हणे माझा साजण सागर भेटेल मला हो कधी..? जीवन म्हणजे डोंगरमाथी पेटीयला वणवा.. जणु मनाला जाळीतो माझ्या दु:खांचा वैशाखवणवा.. जीवन
Taxonomy upgrade extras

मुखवटे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 27/04/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास दोष देऊ..? मी ही गर्दीतला .. जात्यातला कधी , तर कधी सुपातला . माझ्याच सोबत्याची , अंत्ययात्रा हो निघाली , सण्डे होता म्हणुनी , मी ही अटेण्ड केली . दूरुनच जरा घेतले , दर्शन पार्थिवाचे , उपचार जरासे केले , अंत्ययात्रेत चालण्याचे . दुरुन उपचार सारे , मग आंघोळ तरी कशाला..? मी करुनी विचार ऐसा , बाजार सण्डेचा केला . सारे असेच होते , जे भेटले तिथेही , हायसे वाटले मलाही कि त्यांच्यातलाच मी ही घरे कसली आमुची ..? हे अड्डे संभावितांचे ..! भेटतील इथे मुखवटे .. प्रत्येक चेह-याचे..!!

चांदरात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/04/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
चांदरात
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
तू स्पर्श करता जगा मी विसरले मी हरले अन मीच जिंकले न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
Taxonomy upgrade extras

चुप्पी !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 27/04/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य दमला, जरा टेकला, अवनीच्या मग, कवेत शिरला, रंग बिरंगी नभाळ चादर, अंगावरती लेवून पहुडला. सृष्टीचे ते रूप आगळे , पाहुनी माझे "मी" पण गळले, "मी" च नाही तर, "तू" ही कैसा..? अद्वैताचे रहस्य कळले..! नकोच आता काही -बाही शब्दांच्या या कळा पुरे, नि:शब्दातून अव्यक्ताचे, रूप होतसे साजिरे... ॐ चुप्पी !चुप्पी !! चुप्पी !!!

आरती पालीच्या बल्लाळेश्वराची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 25/04/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आरती बल्लाळाची (चालीसहीत) जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा जयदेव जयदेव || ध्रु || देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी आत असे मुर्ती शेंदरी उघडी समोर मोठी घंटा अन खांब लाकडी वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ || जयदेव जयदेव || ध्रु || देवा तुझा वास असे पाली गावी तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ || जयदेव जयदेव || ध्रु || पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे मंदिर स
Taxonomy upgrade extras

एकमत

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/04/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
जिंका हारा पाडा झोडा एकमताने सत्ता येता लोणी चापू एकमताने टांगायाची बाकी आहे वेशीवरती अब्रु लुटूया जत्रेनंतर एकमताने देश आमचा तरुणाईचा पहा झोपला म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही नागवा म्हणती समोरच्याला एकमताने सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली विदुषकांनी केला गोंधळ एकमताने सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने वार्‍यावरती देश सोडला एकमताने तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

कमिलिऑन

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 25/04/2009 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ते मावळतीच्या शेजार्‍याघरीं बालेकिल्ला बांधत होते - तेव्हा ते होते पवित्रभूमिरक्षक! जेव्हा ते उगवतीच्या शेजार्‍याला रक्तबंबाळ करीत होते - तेव्हा ते होते शहीद व्हायला निघालेले स्वातंत्र्यसैनिक! आता त्यांच्या बंदुका रोखल्यात आमच्यावरच - हो, खरे आहे - ते आहेत दहशतवादी!!
Taxonomy upgrade extras

क्षितीज

लेखक निशिगंध यांनी शुक्रवार, 24/04/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितीज दुरुन फार छान दिसते, म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात, तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते. म्हणुन त्याला आपण गाठायचे असते.. जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते, पण आपण मुळीच कंटाळायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात, पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.