Skip to main content

डबके..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 30/04/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
माळावर पडलो डबके होऊन आहे अन् मी असाचं राहीन मंजूर मजला हे विश्व थिटे लखलाभ तुम्हा ते सागरगोटे प्यार मजला माझा चिख्खल तळातील ती ओली दलदल ते म्हशींचे मजेत डुंबणे डुकरांचे अन् सुखनैव लोळणे बगळ्यांचे ते ध्यानबहाणे हळुच गटकन बेडुक गिळणे हिंस्र श्वापदे रात्री येती पिऊनी जलं हे तहान मिटविती कशास तोडू मी माझी बंधने नकोच मजला सागर होणे नदी नाले अन् सागर डबके सृष्टीला तर सगळेच सारखे माणूसच करतो असले भेद कुणी काळा तर कुणी सफेद
लेखनविषय:

वाचने 2024
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कल्पना छान आहे. पण डबक्यापेक्शा नदी मला वाटत जास्त सोइस्कर आहे. तिथेही ह्याच गोष्टी होतात आणि वाहत राहणे हाही प्ल्स पॉइंट आहे.

"ऊठ्सूट इतरांना कमी लेखणार्‍या काही लोकांची मनोवृत्ती " यावर दिलेले थोडेसे "चपराक" स्टाईल उत्तर वाटते.....

पण डबक्याच्या प्रतिमेतून मांडायचा विचार/तत्त्वज्ञान काहीसे कमी पडते आहे, असे वाटते. डबक्याचे एकंदर 'वर्णन' (श्वापदे पाणी पिणे, बगळ्यांनी बेडूक खाणे, म्हशी(?)-डुकरे डुंबणे इ.) कवितेत जास्त व्यापक झाले आहे. त्यामानाने 'विचार' फक्त दुसर्‍या-तिसर्‍या नि शेवटच्या दोन कडव्यात येतो आहे, असे वाटले. मला थिटे विश्व-सागरगोटे फार आवडले. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! (आस्वादक)बेसनलाडू

कविता वेगळी आहे... आवडली... हे आत्मसंतुष्टतेचे कौतुक की त्या कौतुकाचे विडंबन आहे ? असा प्रश्न वगैरे पडला...... अवांतर : मराठी आंतरजालाविषयी काही क्रिप्टिक कॉमेंट आहेत की काय अशा अर्थाने शोध घेतला पण काही सापडले नाही... ;) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)