Skip to main content

कविता

II बुद्ध वंदना II

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 09/05/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज बुद्धपोर्णिमा , महाकारुणी भगवान गौतमबुद्धांचा जन्मदिवस त्या महान तत्ववेत्त्यास त्रिवार वंदन...!! तणाने नष्ट होते शेत तशी द्वेषाने मानव जात प्रेमानेच प्रेम वाढते हाच अमृतपाथ कामासारखा नाही अग्नि घृणा लक्ष्यविहीन लोभ कारण दु:खाचे करे जीवन अपुले कठीण गौतम म्हणे बा मानवा हो जरासा स्मृतिमान सद् धम्माचे मर्म जाणुनी कर जीवन प्रज्ञा

सांज स्वीकारली

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 08/05/2009 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली! उषा रम्य लावण्याची, निशा धुंद तारुण्याची उदासीन, कारुण्याची, मीच सांज स्वीकारली! उषा भूपाळीचे सूर, निशा अंगाई मधूर मनी जागवी काहूर, मीच सांज स्वीकारली! उषा प्रभूच्या कटाक्षी, निशा मीलनाची साक्षी उभी एकली गवाक्षी, मीच सांज स्वीकारली! उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली! उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!
Taxonomy upgrade extras

(एका वृद्धाचे मनोगत)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 08/05/2009 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्धांच्या समस्यांचे चित्रण करणारी 'एका वृद्धाचे मनोगत' ही जागु ह्यांची कविता वाचली आणि आमच्या डोळ्यासमोर काही बेरकी म्हातारे तरळले! म्हटलं ताणलेल्या मनाला जरा विसावा देऊयात! ;) 'साठी बुद्धी नाठी' व्रत घेतले आहे कांगाव्याने आजाराच्या भंडावले आहे जेवणापेक्षा चटकमटक पोट भरत आहे सल्ले कुणाला देऊ?

एका वृद्धाचे मनोगत

लेखक जागु यांनी शुक्रवार, 08/05/2009 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे देणगी देऊन चबुतर्‍यावर नाव कोरल आहे सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे कितीही झाले वाद तर
Taxonomy upgrade extras

पण तु मात्र....

लेखक प्रेरणा यांनी शुक्रवार, 08/05/2009 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यातील आसवं होवून तळहातावर विसावावं क्षणभर... पण तु मात्र तटस्थ उभी असतेस पापण्यांच्या काठावर तुझ्या केसातील गजरा होवून अलगद ओघळावं मांडीवर... पण तु मात्र निस्पर्श असतेस मिटलेल्या देहावर तुझ्या अनावर वेगाचं भान व्हावं क्षणभर पण तु मात्र पाठमोरी उभी असतेस अधीरल्या डोहावर

गाठोडं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/05/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून ! जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी, खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी ! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! आठवणीत ठेवावी एखादी कथा, योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा ! स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !
Taxonomy upgrade extras

माझ्या जमीनीच गाणं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी. लई दिवसापास्न मी तुम्हास्नी माझ्या शेतावर घेवुन जायच म्हनत होतो. तो योग आज आला बघा. चला तर मग माझ्या शेतावर. माझ्या जमीनीच गाणं हि जमीन माझी काळी काळीभोर हि जमीन माझी लई दिलदार || ध्रु || हिच्यामंदी करीतो मी जोंधळा लावीतो कधिमधी हरभरा पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर || १ || हि जमीन माझी ... कोंबडी शेळी बकरं मेंढरं तसच पाळीतो मी रानपाखरं गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं || २ || हि जमीन माझी ... हि विहीर माझी लईलई भारी सतरा झरं तिच्यामंदी पानी भरी अहो मोटर चाले तास चार || ३ || हि जमीन माझी ...
Taxonomy upgrade extras

...तोच आहे.

लेखक अंकुश चव्हाण यांनी गुरुवार, 07/05/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
...तोच आहे. बासरीत सूर ओतले ज्याने, नंदनवन गोकुळी फुलवीले ज्याने, तुजवरी छाया कृपेची धरणारा मुरारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कालियाचे मर्दन केले ज्याने, कन्साचे ताड्न केले ज्याने , तुज वादळात सावरणारा गिरिधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! तुलसिदलात स्वत:ला तोलले ज्याने, द्रौपदिचे लज्जारक्षण केले ज्याने , तुज दु:खाच्या भवसागरातुन तारणारा हरी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! कौरावांविरुद्ध पांचजन्य फुंकला ज्याने, अर्जुनास गीता सांगितली ज्याने, तुज आत्मबळ देणारा सुदर्शनधारी श्री कृष्ण "सखा" तोच आहे ! ही कविताही जर माझ्याकडून पुनर्प्रकाशित झाली असेल तर क्रुपया मला तसे सांगा.

निसर्गचित्र ( गिरीभ्रमणाच्या वाटेवर )

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 06/05/2009 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी , १५ आणि १६ ऑगस्ट, २००६ ह्या दिवशी 'कोथळीचा भैरवगड आणि हरिश्चंद्र्गड" हा सलग ट्रेक केला, त्यावेळी मला भावलेला निसर्ग शब्दबध्द करावासा वाटला. * * * * अनंत हिरव्या रंगछटांनी सजला डोंगरमाथा बेलागकड्यांच्या मधून फिरती दुर्गम पाऊलवाटा डोंगरझाडीमधुनी खुलते रंग फुलोरी नक्षी हिरव्या पानांआडूनी दिसतो लाल-सावळा पक्षी कडे कपारीवरुनी उतरे वेगाने जलभार कोसळूनी ओढ्यात उधळतो फेनल, शुभ्र तुषार खळाळ जल ओढ्यात पसरते घेऊन तांबूस माती भिजवीत काठावरची सारी हिरवी लव्हाळ पाती धुंद, गार वार्‍यावर डुलते गवतफुलांची काया हळूच उतरे गिरी माथ्यावर मेघ सावळी छाया
Taxonomy upgrade extras

एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली

लेखक स्वप्निल मन यांनी बुधवार, 06/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली कोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले भाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती जशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती गाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा अ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा खाली होताच window seat तिला मी देऊ केली thank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली केस तिचे माझ्या चेहर्‍याशी खेळत होते हृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते सुवास तिच्या गजर्‍याचा म॑द येत होता हळूहळू मला तो धु॑द करत होता कसा गेला वेळ नाही कळले काही न॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही
Taxonomy upgrade extras