Skip to main content

बालमजूर

लेखक जागु यांनी सोमवार, 15/06/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय नशिबा माझी कहाणी बालमजूर मी, बाल्यावस्थेची समाधी बापाची माया लुटली जुगारी मायची मारझोड उघड्या नजरी आक्रंदती काळीज ममतेसाठी ममताही मायची दव्यातच उरली तिन्ही पोटचा मी भार वाही देवही ना प्रसन्न उपाशी पोटी शिक्षण ना चव हलव्याची मालकाच्या लाथा अन तुकडा पदरी कोवळे शरीर चिकटतसे सापळी लाल रक्त जळून भिने काळ्या रंगी खेळ, बागडण्यास ना त्राण अंगी मायच्या जखमेची चिंता सदा उरावरी.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1893
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आजूबाजूला बघायला लावणारी कविता ! संवेदनशीलता अशीच राहो या शुभेच्छा आणि ज्या दिवशी बालमजूरी पूर्णपणे बंद होईल तो सुदिन.

धन्यवाद संदिप. अजुन अशी खुप परिस्थीती झापडं उघडून पाहण्यासारखी आजुबाजूला दिसते.