पावसाला विनंती
अरे अरे पावसा, तू पड भसाभसा
तू पड भसाभसा
वेडा झाला बळी राजा
नको देऊ त्याला सजा
वर पहाता पहाता, जीव झाला रड्कासा
तू पड भसाभसा
का रुसला आम्हावरी ?
तुझ्याविना कोण तारी
सा~या सजिवांचा देव, तुझ्यावरच भरवसा
तू पड भसाभसा
पुर्वी तानसेन राग म्हणायचा
धो धो पाऊस पडायचा
तु नाही पडला तर, सुर गवसेल कसा
तू पड भसाभसा
नद्या नालेही ओसरली
तळे सुध्दा खाली झाली
गुरं ढोरं वेडी झाली, जसा पाण्याविणा मासा
तू पड भसाभसा
तुझ्या विणा शेती नाही
शेती विणा काम नाही
पाण्याच्या शोधात, माऊलीचा जीव झाला रड्कासा
तू पड भसाभसा
आकाश झाले कोरडे
जमिनीला गेले तडे
कोठे लपला वरुण राजा, ये जसा येशील तसा
तू पड भसाभसा
राजाभाऊ गायकवाड.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1098
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजाभाऊ