मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाऊस

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हटवादी पोर हुंदके दाबत, जिन्याच्या पायरीवर बसावं असा पाऊस. पोळलेल्या हातानी घ्यावा कसा कडेवर.? ------------------------------------------------------------------------------------------------------ पाऊस भरतुकडा नादान साजण . कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का?

वाचने 8271 वाचनखूण प्रतिक्रिया 21

अवलिया 11/06/2009 - 12:01
दुसरी जबरदस्त !! खास रामदास स्टाईल !! वा ! मजा आली !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

राघव 12/06/2009 - 15:59
क्लास! भारी लिहिलेत.. नेहमीप्रमाणेच. अवलियांशी सहमत! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

मराठमोळा 12/06/2009 - 15:06
सुंदर प्रकटन!! :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

वेताळ 12/06/2009 - 17:34
मस्त कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? म्हणुनच सरकार म्हणतय की पाणी अडवा पाणी जिरवा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

धनंजय 12/06/2009 - 19:41
पहिली कविता समजायला वेळ लागला, (माझ्या मतीने - मला कळलेला अर्थ तो कवीचा होता की नाही कोणास ठाऊक), पण समजल्यावर आवडली. दुसरीसुद्धा सहजसुंदर.

विसोबा खेचर 15/06/2009 - 09:16
कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? वा! क्या बात है.. आपला, (चाळीशीत असल्यामुळे आस्ते आस्ते वाफ जिरत चाललेला) तात्या.

NAKSHATRA 27/01/2021 - 18:06
कळत कसं नाही ? एका -अर्ध्यामुर्ध्या सरीनी कधी वाफ जिरते का? वा! क्या बात है..