Skip to main content

कविता

व्यथा

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 24/09/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा ------------------------------------ जरी वाटतो नवाच आहे ऋतु कालचा तसाच आहे.. प्रतिबिंबासही रोज वाटते मीही देखील खराच आहे.. रामासाठी सीता होणे खरा दोष हा तिचाच आहे.. इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. किती भरावे सूख तरिहि अर्धा प्याला रिताच आहे.. मला नकोसा शेवट झाला किती कथांची व्यथाच आहे..! - योगेशु

गणित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
कधी शब्द ते वत्सल कधी प्रहार झेलायाचे कधी ओंजारणे स्नेहाळ कधी आघात सोसाट्याचे मनात असते कायम भय आंधळ्या डोहाचे अंधारभुल होते धुसर सुसाट वारे दु:खाचे येते नभा पल्याडुन बोलावणे कधी सौख्याचे कधी कोसळणे आकाश ओझे ते अनपेक्षिततेचे कोवळ्या अन किरणांतुनी ओघळणे कधी सुर्याचे रखरखाट कुठे तप्तसा हे जगणे असंतुलनाचे मी शोधतो वाट माझी सोडवीत गुंते रस्त्यांचे सुटले नाही कधीही मज गणित आयुष्याचे विशाल.

साडेसाती

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/09/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्‌वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले

CPU ची गोष्ट

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 21/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता बायकांची मागणी , मला जरा वेळ देता एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो Restart होतो अन सगळं विसरुन जातो मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत आता ही नवी कोण आयुष्यात आली माझा वेळ अन मेमरी घेउन गेली मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय का वायरस मध्ये फसत चाललोय ह्या बायका अन पोरांना वेळ देता देत

शोकांतिका...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 21/09/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मो. क. गांधी भेटले होते महात्मा गांधींना पाहिलंस का? म्हणुन विचारत होते त्यांनी म्हणे कधीकाळी रामराज्याचा संकल्प सोडला होता काल सांगत होते त्यांच्या रामराज्यातला रामच हरवला होता त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं पोरा.. आजकाल सगळेच गांधीवादी झालेत बहुतांशी खादी(?)वादी झालेत आज समाजात खादीला(?) मोठा मान आहे मनात गांधी नसला तरी डोईवर गांधीटोपीची शान आहे गांधीवादातला वाद राहिलाय गांधी कुठेतरी हरवलाय....! कुणी येताय का शोधायला.. हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय.. काल रात्री मोहनदास करमचंद गांधी भेटले होते हरवलेल्या महात्म्याला.. एकटेच शोधत होते...! विशाल

भोंडला

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 21/09/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्राचे दिवस म्हणजे हादग्याचे, भोंडल्याचे, भुलाबाईचे दिवस.
काव्यरस

..पट्टराणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 20/09/2009 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
..पट्टराणी.. ------------ करु नको माझ्याकडे तु गं अशी पाठ राणी.. सोडु का ग सांग तुझ्या चोळीची मी गाठ राणी.. जीव होतो कासावीस,तू गं अशी रुसताच.. पहा माझ्याकडे आणि हास ना ग एकदाच.. तुझ्या कुशीमध्ये पुरी सरु दे गं रात राणी... राग इतुका गे आला,वर धरीला अबोला.. रात विरहात जाई शिक्षा तुला आणि मला.. बोल ना ग माझ्याशी तु..बिलगुनि घट्ट राणी... गुंफु दे गं हातामध्ये माझ्या तुझे दोन्ही हात भिडु दे गं ओठालाही तुझे मधाचे गं ओठं.. लागु दे गं सुर आता..धुंद सप्तकात राणी... दिस तर जातो जसा..रात नको विरहात.. मिठीतुनि पाहु दे ना..मंद कोवळी पहाट.. वाटे मग मी गं राजा..तु गं माझी पट्टराणी.. ------------ योगेशु
काव्यरस

"मिलर ऑफ द डी"

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/09/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर. कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी "चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला, वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी?
काव्यरस

श्राद्ध

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 18/09/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित. श्राद्ध
मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो, ती जीवंत असताना ,तीला कधी, प्रेमाने साडी आणली नाही... पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र, दरवर्षि घालतो....... ती जीवंत असताना, तिला कधी, प्रेमान जेवु घातले नाही, पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र दरवर्षि दाखवतो.... ती आजारी होती..