Skip to main content

साडेसाती

साडेसाती

Published on 21/09/2009 - 21:06 प्रकाशित मुखपृष्ठ
देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्‌वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले
लेखनविषय:

याद्या 1838
प्रतिक्रिया 4

देतील, बरेच जण देतील. इथेच मिळेल दिलासा, काळजी नको. मुख्य - कविता बरी आहे.

श्रा मो शी सहमत. बरेच जण इथे उत्तर देतील तुम्हाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बाबा... २५० रूपयान्चा तर प्रश्न आहे.... का फुकाचा त्रास करून घेतोस? आणि साडेसातीचं म्हणशील तर ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिची सावली मात्र इथे कायम पडीक असते...