Skip to main content

श्राद्ध

श्राद्ध

Published on 18/09/2009 - 20:36 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित. श्राद्ध
मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो, ती जीवंत असताना ,तीला कधी, प्रेमाने साडी आणली नाही... पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र, दरवर्षि घालतो....... ती जीवंत असताना, तिला कधी, प्रेमान जेवु घातले नाही, पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र दरवर्षि दाखवतो.... ती आजारी होती.. अंथरुणाला खिळुन होती तिच्या सर्वांगाला दुर्गंधि येत होती, मी कधी तीला प्रेमाने आंघोळ घातली नाही पण तिच्या पिंडावर गुलाब पाण्याचे प्रोक्षण मात्र, दरवर्षि करतो...... ती जीवंत असताना कधी तीला प्रेमाने वेणी आणली नाही.. पण तिच्या प्रतिमेला भलामोठा हार मात्र दरवर्षि घालतो..... लोक म्हणतात, तु हे करतोस पण आईच्या मरणांति जीवंतपणी केली असतीस तिची सेवा तर मिळालि असती तिच्या आत्म्याला शांती.. खर आहे पण आपल्या सगळ्याच इच्छा काही पुर्ण होत नाहीत म्हणुन मी माझ्या मुलाला सांगतो बाबारे ! मला जे जमल नाही ते तु कर म्हातारपणि आमचा नीट साभांळ कर .... पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं ते जर जमल असतं तर या प्रुथ्वीवर आनंदवन फुललं असतं...... असो..! कावळ्याला पिंड ठेवतो थोड्यावेळ वाट बघतो... नाही शिवला तर दर्भाचा करतो आणि आपण आपल जेवुन घेतो माझ्याही पोटातले कावळे आता काव काव करीत आहेत..... काव... काव... काव.....! ! !
लेखनविषय:

याद्या 3096
प्रतिक्रिया 13

(जे असे वागत असतील त्यांच्या) डोळ्यात अंजन घालणारी कविता.

>>पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं अगदी अगदी

:( :( :( मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

तरीही वास्तवातली कविता! पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं ते जर जमल असतं तर या प्रुथ्वीवर आनंदवन फुललं असतं...... खरंच आहे. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

अस्वस्थ करणारी कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आजूबाजूला हेच तर बघतो आपण ! त्यात नि:शब्द होण्यासारखे काय ? जगणार्‍या लोकांनी, जगताना त्याच्यावर प्रेम करणं कठीण का असतं, ह्याचा विचार करावा. मेलेल्या लोकांशी डे-टू-डे संबंध येत नाही, म्हणून त्यांना मेल्यानंतरच श्राद्ध (श्रद्धेचा आविष्कार, ह्या अर्थाने) घालणे सोपे असते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)