Skip to main content

कविता

काहीतरी राहिले आहे इथे

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 01/10/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी राहिले आहे इथे
असाच आलोय इथवर. येताएत अजून माझी पत्रे या पत्त्यावर...? हो, काही मिळाली वरचा पत्ता बदलून पोस्टात परतवलेली... पण राहिले होते कपाटात, मला वाटते, माझे काही कपडे. नाही मागवलेत फोनवरून, म्हटले - मीच येऊन शोधावेत. नाहीत सापडले. अरेच्चा! आहे की बोचके इथे बांधूनही ठेवले.
.
ती आतली खोली माझ्या आठवणीतली तशी नाही राहिली... हो, दिवाणखाना आहे तसाच...
काव्यरस

फक्त तुझ्यासाठी ...(यावेळी कविता)

लेखक प्रभो यांनी बुधवार, 30/09/2009 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता.... तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात | तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात || ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय | तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय || प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा | जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा || नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण | तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण || तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर | तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर || आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा | तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मल
काव्यरस

अंगुठे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 29/09/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
अंगुठे आज या "मिसळपावा"वर "मिसळभोक्ते" किती येती | व्रते "एकलव्या"ची जरी घेती, बाण ते स्वैर सोडिती || बरे जरी आजचे द्रोणही, मुळी "अंगठा" न मागती | मात्र हे "मिभो" सर्वत्र, काय "अंगठा"च दाविती || अरे थांबा, नका दावू, "अंगुठे" तुम्ही सर्वत्र | न ते "स्वाक्षरी" बघती, "अंगुठे" काय पाहतील? ||

मुजरा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 29/09/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही सगळे दिवस काळ्या आमावस्याच माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही सगळ्या वरवरच्या मलमपट्या अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही

माहित नाही

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 29/09/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: समझनेवाले, समझ गये है, ना समझे वो अनाडी है) माहीती नाही, कोण ते लोक, ज्यांच्या प्रेमाला प्रेम मिळाले.... आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार निघून गेला.... निघून गेला..... निघून गेला, प्रत्येक मित्र देऊन, दोन क्षणांची साथ वेळ कुणाला, इथे जो देतो, वेड्यांचीही साथ मला तर माझी छायाही नेहमीच मिळाली बेजार आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार ह्यालाच जीवन म्हणतात तर असेच जगुन घेऊ तक्रार नाही करणार ओठ शिवून घेणार अश्रू पिऊन घेऊ दु:खाला नाही घाबरणार कारण शंभरदा ते मिळणार आम्ही तर फक्त, कळ्या मागितल्या, पण मिळाले, काट्यांचेच हार हाय काय
काव्यरस

माझा प्रियतम

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 29/09/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: ओळखा पाहू ?) माझा प्रियतम गेला रंगून आणि दूरध्वनी केला तिथून तुझी आठवण मला येते हृदयात आग माझ्या लावते मी सोडुन हिंदुस्तान खूप पस्तावलो, खूप पस्तावलो.. झाली चूकच माजी, तुला घेऊन नाही आलो घेउन नाही आलो... मी म्यान्मार्च्या गल्लीत आणि तू आहे डेराडुनात, तूझी आठवण गं येते.. तूझी आठवण गं येते.. जबरा, हाय का नाई ? हरलात ?? हरलात ???? कळवा.. खरडवहीतून उत्तर कळवण्यात येईल...
काव्यरस

एक आकाश माझही

लेखक अनुप्रिया यांनी सोमवार, 28/09/2009 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ आकाश कायम माझच असत तसही कोणी मागायला नाही येणार ते हसू नकोस.....माहीतीय मला खरच नाही येणार..........कोणीसुध्दा का याव?? अस काय विशेष तो एक तुकडा........ म्हणल तर फाटकातुटका माझ्या मनात कायमचा विसावलेला पावसाला आणणारा विजांना चमकवणारा शुभ्र धुक पाखरणारा आणि हळूच त्या तेजोगोलाच दर्शन घडवणारा म्हण म्हण पुरे त्याच कौतुक जेलस झालास ना??? नाहीच कळणार तुला आमच स्पेशल नात ए........रूसू नको ना..... लहानपणी आजी मग आई-बाबा सरतेशेवटी तू ............... सर्वांनाच घर दिलय ना?? ...........त्या आभाळात........... - सोनाली घाटपांडे

रान

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
काव्यरस

कवी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 24/09/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा एक कारखाना चालवतो मी एकाच साच्यातल्या कविता छापतो मी आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी गावरान गोडवा न ठाउक मला उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी हवे ते, जेंव्हा नाही गवसत मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा- गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी