Skip to main content

कविता

येडा टिंब

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 06/10/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुस्वार नाकातुन गाणारा एक स्वल्पविराम मधेच थांबणारा एक अर्धविराम अर्ध्यात थकलेला अन पुर्णविराम रस्त्यात झोपलेला अन मी एक येडा टिंब बरेच काही सांगणारा कधी मी अनुस्वार तर कधी पुर्णविराम, तुम्ही द्याल तो अर्थ कागदावर सांडणारा ...

पैंजण...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/10/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भीती वाटु लागलेय आजकाल.., माझ्याच पायातल्या पैंजणांची ! सदोदीत पाठलाग करणार्‍या.., त्यांच्या त्या किणकिणाटाची. खुप हौसेने घातलं होतं आईनं..., तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी ! वय वाढलं...., समज आली....., पण पैंजणांचा मोह सुटला नाही ! बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... पण आता मन मोहरत नाही..., आता थबकत नाहीत नजरादेखील...... राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्म
काव्यरस

भैरवी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 06/10/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
काव्यरस

एक सत्य

लेखक jaypal यांनी सोमवार, 05/10/2009 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
एके दिवशी असाच संध्याकाळी मद्यालयात निवांत मद्यानंद घेत एकटाच बसलो होतो. त्या मद्यालयातील खांबांवरती आरश्याचे तुकडे चिटकवले होते आणि त्या तुकडयां मधे माझी असंख्य प्रतीबिंबे दिसली आणि ४ओळ्या सुचल्या...... टुटी फुटी ऐनक तेरी टुटे फुटे विचार एक सत्य नित्य है दिखे तुझे हजार
काव्यरस

नाते चंद्राचे

लेखक अनुप्रिया यांनी शनिवार, 03/10/2009 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यान रात्री नि:शब्द काळजाला...... चंद्र येतो भेटीला चंद्र असतो साक्षीला....... चंद्राशी आमचे अतुट नाते........ असते खरे किंवा खोटे......... चंद्रबिंब ते मोहीत करते...... पाण्यात ते विरून जाते......... चंद्र सर्वांचा सखा सोबती......... सान थोरांची याच्यावर प्रिती......... उर्जा ही शीतलतेची........ भेट लाभते अमृतवर्षेची......... - सोनाली

माकडा माकडा हुप

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/10/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
माकडा माकडा हुप
माकडा माकडा हुप तुझ्या शेंडीला पावशेर तुप तुप जाय चाटीत चिंचा दे पाटीत चिंचा आहेत लांबट तोंड झाले आंबट आपण दोघ बागेत फिरू मग मला दे पेरू पेरू आहे गोड मोठा अरे पळ पळ, आला माळीदादाचा सोटा -पाषाणभेद

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 01/10/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. गुलझार) अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र कशी सामावू नीज माझ्या नयनी दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी श्रीकृष्ण सामंत
काव्यरस

बोलत होता मोबाईलवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/10/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
बोलत होता मोबाईलवर
आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच. - सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर. "हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर. आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?

काहीतरी राहिले आहे इथे

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 01/10/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी राहिले आहे इथे
असाच आलोय इथवर. येताएत अजून माझी पत्रे या पत्त्यावर...? हो, काही मिळाली वरचा पत्ता बदलून पोस्टात परतवलेली... पण राहिले होते कपाटात, मला वाटते, माझे काही कपडे. नाही मागवलेत फोनवरून, म्हटले - मीच येऊन शोधावेत. नाहीत सापडले. अरेच्चा! आहे की बोचके इथे बांधूनही ठेवले.
.
ती आतली खोली माझ्या आठवणीतली तशी नाही राहिली... हो, दिवाणखाना आहे तसाच...
काव्यरस