Skip to main content

गणित

गणित

Published on 22/09/2009 - 10:37 प्रकाशित मुखपृष्ठ
कधी शब्द ते वत्सल कधी प्रहार झेलायाचे कधी ओंजारणे स्नेहाळ कधी आघात सोसाट्याचे मनात असते कायम भय आंधळ्या डोहाचे अंधारभुल होते धुसर सुसाट वारे दु:खाचे येते नभा पल्याडुन बोलावणे कधी सौख्याचे कधी कोसळणे आकाश ओझे ते अनपेक्षिततेचे कोवळ्या अन किरणांतुनी ओघळणे कधी सुर्याचे रखरखाट कुठे तप्तसा हे जगणे असंतुलनाचे मी शोधतो वाट माझी सोडवीत गुंते रस्त्यांचे सुटले नाही कधीही मज गणित आयुष्याचे विशाल.
लेखनविषय:

याद्या 1563
प्रतिक्रिया 4

वाचाविशी कविता. मला फक्त ती अंधारभूल कळली नाही.

येते नभा पल्याडुन बोलावणे कधी सौख्याचे कधी कोसळणे आकाश ओझे ते अनपेक्षिततेचे छान! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी