आता नाही ...!
आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही !
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही !
वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या "हाssssड", आता नाही !
कल्पनांचा मना लाभला आधार नि...
जाणिवांची तशी चाड आता नाही !
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही !
विशाल.
लेखनविषय:
याद्या
2299
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
कल्पनांचा
सहमत
In reply to कल्पनांचा by प्राजु
धन्स
छान आहे
मस्त!
कविता
आभारी आहे.