Skip to main content

CPU ची गोष्ट

CPU ची गोष्ट

Published on 21/09/2009 - 15:08 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता बायकांची मागणी , मला जरा वेळ देता एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो Restart होतो अन सगळं विसरुन जातो मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत आता ही नवी कोण आयुष्यात आली माझा वेळ अन मेमरी घेउन गेली मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय का वायरस मध्ये फसत चाललोय ह्या बायका अन पोरांना वेळ देता देता नाकी नऊ येतात मग मलाही कधी कधी वायरसची गोड गोड स्वप्ने पडतात इतक्या बायका असुनही , मन काही थार्‍यावर नाय वायरसच्या गुलाबी स्वप्नांशिवाय जगायची मजाच नाय बाप माझा बोलला, नविन घराण्याशी नाते जोडु आता फक्त Linux, Windows ची नाळ तोडु आता काय मज्जाच मज्जा, नविन बायका नविन सासु बापाचे म्हणणे फक्त एकच , वायरसला नको फसु
लेखनविषय:

याद्या 1486
प्रतिक्रिया 2