माहित नाही
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा: समझनेवाले, समझ गये है, ना समझे वो अनाडी है)
माहीती नाही,
कोण ते लोक, ज्यांच्या
प्रेमाला प्रेम मिळाले....
आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार
निघून गेला....
निघून गेला.....
निघून गेला, प्रत्येक मित्र
देऊन, दोन क्षणांची साथ
वेळ कुणाला, इथे जो देतो,
वेड्यांचीही साथ
मला तर माझी छायाही
नेहमीच मिळाली बेजार
आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार
ह्यालाच जीवन म्हणतात तर
असेच जगुन घेऊ
तक्रार नाही करणार
ओठ शिवून घेणार
अश्रू पिऊन घेऊ
दु:खाला नाही घाबरणार
कारण शंभरदा ते मिळणार
आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार
हाय काय अन नाय काय.....
(आदरणीय गोळे काका, आणि आदरणीय सामंतकाका, आपल्या आवडत्या हिंदी/उर्दू रचना कृपया आम्हास कळवाव्यात, आम्ही त्या सर्व रचनांचीशुद्ध मराठीत मोडतोड, उर्फ भाषांतर, करून देऊ. आणि सर्व भाषांतरे, उर्फ मोडतोड मूळ चालीत म्हणता येईल, ह्याची ग्यारंटी इथे मिळेल. ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय. धन्यवाद.)
वाचने
3374
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
ह्म्म
काल जोरदार
In reply to काल जोरदार by टारझन
आकस
In reply to आकस by मिसळभोक्ता
हॅहॅहॅ ..
जबरा..!
छान मोडतोड...भाषातंर केले आहे.
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by अवलिया
+१
सुरेख भाषांतर आहे, परंतु अजून सुधारणेला वाव आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सुरेख भाषांतर आहे, परंतु अजून सुधारणेला वाव आहे. by नंदन
धन्यवाद, नंदन, खरेच सुधारणेला अजूनही वाव आहे
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार
लय भारी रे
मिभो आणि जे न देखे रवी
जवळ जवळ