Skip to main content

एक आकाश माझही

एक आकाश माझही

Published on 28/09/2009 - 17:59 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ आकाश कायम माझच असत तसही कोणी मागायला नाही येणार ते हसू नकोस.....माहीतीय मला खरच नाही येणार..........कोणीसुध्दा का याव?? अस काय विशेष तो एक तुकडा........ म्हणल तर फाटकातुटका माझ्या मनात कायमचा विसावलेला पावसाला आणणारा विजांना चमकवणारा शुभ्र धुक पाखरणारा आणि हळूच त्या तेजोगोलाच दर्शन घडवणारा म्हण म्हण पुरे त्याच कौतुक जेलस झालास ना??? नाहीच कळणार तुला आमच स्पेशल नात ए........रूसू नको ना..... लहानपणी आजी मग आई-बाबा सरतेशेवटी तू ............... सर्वांनाच घर दिलय ना?? ...........त्या आभाळात........... - सोनाली घाटपांडे
लेखनविषय:

याद्या 1569
प्रतिक्रिया 5

छान... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

शेवटच्या दोन ओळींनी संपुर्ण कवितेचा अर्थ उलगडला. आवडली. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।। रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।। -कवी कलश