कधी कधी
कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगांनाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत
कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे
कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे
कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..
कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे..
लेखनविषय:
याद्या
1484
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
सह्ही !!
+१
In reply to सह्ही !! by अनिल हटेला
डिट्टो
In reply to सह्ही !! by अनिल हटेला
छान . पण
मस्त!
धन्यवाद