नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी
या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे?
गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे
रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी
गोड अंगाई तुला ही रातराणी ऐकवी
मंद हिंदोळ्यात बाळा चंद्र हलके जोजवी
अजुनि तुझिया लोचनी का जाग बाकी श्रीहरी?
ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!
साद देती का तुला रे स्वप्नपाखी श्रीहरी?
[प्रेरणास्त्रोत असणारं चित्र जालावरून साभार.]
छान गीत आहे!
देव काका .. चाल अस्त्र काढाच तुम्ही आता! होऊन जाऊ दे!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
एकदम टॉप लेव्हल !
चांदण्या जणु सांडल्या,या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे? आणि चांदण्या जणु सांडल्या हे खूप आवडले.
देव काकांची चाल ऐकण्यास आतुर ..
गायला जमत नाही ना! म्हणून ऐकण्यास आतुर ...
मीनल.
छान गीत
In reply to छान गीत by मेघवेडा
मस्तच आहे.
गोड
हाय क्लास
आक्षी
सुंदर