लेखकपाषाणभेदयांनी गुरुवार, 01/04/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया.
सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...)
(राजेश घासकडवींचे अन Nile यांचे खास आभार.
लेखकसुवर्णमयीयांनी बुधवार, 31/03/2010 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवसायाभिमुख शि़क्षण
चित्रातला गुलाबाचा बुके पाहून
त्याला आठवले
तिच्या डाव्या वक्षावरचे गोंदण..
ते राहिलेच काल..
तो स्वतःशी पुटपुटला
प्रदर्शनात तिला मात्र
आवडले होते
हत्ती घोडे आणि मांजर
घरी आल्यावर ती
कामवाल्या बाईला सांगत होती
तिला आवडत ते त्याला कस पटत नाही..
"नवरा हाय म्हणून हाय सगळी कटकट
असला तरी कटकट आनि नसला तरी बी.."
फरशी पुसत बाईने उत्तर दिले.
शाळेत सहाव्या सातव्या वर्गातली मुले
सचित्र शिकत होती
नर मादी आणि
प्रजनन
व्यवसायाभिमूख शि़क्षणाचे
अवलंबन केल्याबद्दल
शिक्षणमंत्री टाळ्या घेत होते
-सोनाली जोशी
लेखकचित्रायांनी बुधवार, 31/03/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववरच्या लोकांसाठी याआधीही मी कवितेसारखे काही तरी लिहीणे नवीन नाही! त्यातलाच हा एक प्रकार आहे तो समजून घ्यावा.
ही कविता (किंवा जे काही आहे ते) लिहीण्यामागे माझी जरा मजबुरी आहे. दातात पेरूची बी अडकल्याप्रमाणे झाले आहे, त्यामुळे ती काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही!
लेखकManish Mohileयांनी मंगळवार, 30/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज.
आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली.
लेखकप्राजुयांनी मंगळवार, 30/03/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेवरती राग धरूनी, आवस धुसफ़ुसली
काळोखाला घेत साथीला, चंद्रकळा लपविली..
भरात आला खेळ मोडला, अवनी थरथरली
अवकाशाला रिक्त पाहूनी, मूकपणे रडली
उदास झाल्या अवनीसाठी, 'प्रथमा' मग धावली
चंद्रकोर ती नाजूक रेखीव, आकाशी सजली
रोज नव्याने पुन्हा पुन्हा ती, कोर नटू लागली
संध्याराणी तिच्या दर्शने, गोड हसू लागली
नव्या यौवनी चंदाराणी, मोहरूनिया गेली
तिला रिझविण्या सागरलाटही, उचंबळू लागली
लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली
क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली
- प्राजु
लेखकअनुप्रियायांनी सोमवार, 29/03/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरून जाताना
दिसायच ग्रेव्हयार्ड
लक्ष वेधून घेणारी पांढ-या फुलांनी
आच्छादित कबर
वाटायच आकर्षण त्या
नाजूक फुलांच
जाव आत लावावा हात
उचलून आणावीत ओंजळभर
केला धीर गेलेच एकदा
उचलली फुल थोडी
पलीकडच्या कबरीवर
दिसली तितक्यात
-------------------------------
एक मुलगी शुभ्र वेश
जणू परी अस्मानीची
हातात तशीच पांढरी फुल
त्या कबरीवर नाव
JOHN ANDREWS
15/12/97
आणि माझ्या समोरच्या कबरीवर
MERRY JOHN ANDREWS
15/12/97
अंगावर काटा..........
निशब्द सायंकाळ..........
आणि एकच हवेचा झोत............
- सोनाली घाटपांडे
लेखकपाषाणभेदयांनी सोमवार, 29/03/2010 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
रेडिओ
लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न
असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म?
असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी
एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी
एकतर रेडिओचा आकार छोटा
गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा!
खासच असतील ही माणसे एकजात
तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ?
एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते
तिचे गाणे म्हणून ती निघून जाते
नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो
त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो
निश्चितच आहे सगळे वेगळे
त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे?
हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काका