Skip to main content

न्युड पोर्ट्रेट

न्युड पोर्ट्रेट

Published on 08/03/2010 - 16:31 प्रकाशित मुखपृष्ठ
*********************************************************************************** ती आजकाल माझ्याशी बोलतच नाही. कधी कधी माझ्याबद्दल मात्र बोलते... काल विचारलंच तिला... माझी कविता वाचलीस? ................... .......................... तर..... तिच्या कपाळावर या एवढ्या आठ्या..... कपाळावर आलेली बट तिने मागे सारली... जवळ जवळ ओरडलीच..... "आजकाल कसली कसली न्युड पोर्ट्रेट्स काढतोस रे?" मानवाच्या फसकलेल्या नितीमत्तेची... टरकलेल्या चारित्र्याची.... आणि सदैव कोड्यात पाडणार्‍या कडवट सत्याची? असं नको रे करू राजा.... पोपट मेला आहे म्हणुन सांगायचे दिवस गेले आता....! *********************************************************************************** विशाल.
लेखनविषय:

याद्या 2769
प्रतिक्रिया 13

पोपट मेला आहे म्हणुन सांगायचे दिवस गेले आता....!
म्हणजे काय? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

स्पष्टवक्तेपणाचे दिवस राहीले नाहीत...किंबहुना लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिलेले आवडत नाही.... हा अर्थ ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

छान... शेवटच्या वाक्याचा संदर्भ कळला लगेच. बिपिन कार्यकर्ते

पोपटावरुन एक विनोद आठवला.. पोपटीण बाळंत होणार म्हणुन पोपट तिला दवाखान्यात नेतो...लेबर रुम मधुन डॉक्टर बाहेर येतात पोपट विचारतो उत्सुकतेने काय झाले? डॉक्टर ,म्हणतात.." काय होणार? पोपट झाला"

कलादालनात घालायचा विषय कवितेत घातल्याचे पाहून अंमळ निराशा झाली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

बर्‍याच वेळानी मिभो काय म्हणतायत ते ध्यानात आलं. आणि मग ..... ह. ह. पु. वा. : ) ********************************** To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole