मी त्या रक्ताच्या शोधात आहे....
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about मी त्या रक्ताच्या शोधात आहे....
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले.
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे.
ज्यांनी मराठी मनगटांना
स्वराज्याचे बळ दिले......
आज जो मराठ्यांना पुन्हा
लढायला लावेल...
हर हर महादेव पुन्हा
गगन भेदून राहेल.....
फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
पूर्वी सारखे आज ही
परकीय आक्रमण वाढत आहे....
माझ्याच मातीत आज माझी
मराठी गाढली जात आहे.....
सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे..
मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे...
-पंचम..