मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवण

विश्नापा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रसिक मिपाकर, माझी मिपासाठी पहिलीवहिली रचना, शाळा-कॉलेजाच्या दिवसांमध्ये लिहिलेली.. षड्ररसांनी भरलेल्या आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत... आठवण याद आहे अजून मजला, श्रावणातल्या त्या बरसातीची | याद आहे अजून मजला, चित्त चिंब भिजविणार्‍या त्या नाजूक श्रावणधारांची || कसा विसरेन मी, तुझी ती पावसातील सोबत | तुझ्या अन त्या श्रावणगगनाविना भान न दुजाचं होतं मला प्रेमाच्या पवित्र त्या नगरीत || तुझ्या मनातलं सारं काही सांगत होत्या त्या जलधारा | अबोल,नि:शब्द माझ्या मनाला, बोलका करु पहात होता वारा || चालला होता श्रावणघनही तो , आपुल्याच मस्तीत | नवप्रीतीचा संदेश देत घेत, दोन मनं होता जुळवितं || धरती-मिलनासाठी जरी आकाश, तडपत होते एकले,अधांतरी | तृप्त धरणीला पाहून मात्र, हसले होते,सुखावले होते अंतरी || थेंबागणिक कोमल कळी का होती उमलत, अजूनही न उमजे मजला | श्वासागणिक हळवी प्रीत का होती बहरत अजूनही न कळे मजला || प्रिय, असाच श्रावण या जीवनी आणखी बरसेल का? अशीच श्रावणसोबत तेव्हा, प्रिय तू देशील का?

वाचने 1217 वाचनखूण प्रतिक्रिया 4

पैसा 09/09/2010 - 20:52
पावसासारखीच छान!