कविता - २
लेखनविषय:
किती कथा, किती व्यथा.....
इथून-तिथून, अशा तशा
ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या
चार भिंती, चार फरशा !
आत-आत खोल-खोल
भिरभिर फिरता एक भोवरा...
सांग ना आता कुठे-कसा
शोधून सापडेल खरा चेहरा ? ?
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
वाचने
1517
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सुरुवात आवडली
आहे.
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
हे जास्त आवडले.
शोधून सापडेल का खरा चेहरा ??
अथान्ग , कधी तरी अचानक येईल असा चेहरा समोर !!!
प्रतिक्शा मात्र करु नका ,चालत रहा पुढे पुढे !!
आभार !
छान आहे. :)
In reply to छान आहे. by प्राजु
आणि हो, प्राजु तुमच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन !!!
किती कथा, किती व्यथा.....
इथून-तिथून, अशा तशा
ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या
चार भिंती, चार फरशा !
आत-आत खोल-खोल
भिरभिर फिरता एक भोवरा...
सांग ना आता कुठे-कसा
शोधून सापडेल खरा चेहरा ? ?
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
अर्थपुर्ण कविता..............भावली
छान...
कविता आवडली.
सुरुवात आवडली