Skip to main content

पिकलं पान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/09/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पिकलं पान
पिकलं पान झाडाला म्हणते बाय बाय माझं आता काय काम? ||१|| पिकलं पान हिरवटपना जात नाही केव्हा गळेल केव्हा गळेल? झाडालाच चिकटून राही ||२|| पिकलं पान झाडावरून गळून जाई झाडाखाली पडून पडून सडून जाई ||३|| पिकलं पान झाडावरून पडून जाई जमीनीवर पडल्या पडल्या जुन्या दिवसांची आठवण येई ||४|| पिकलं पान विचारी दुसर्‍याला माझा खांदा तुला? की तुझा खांदा मला? ||५|| पिकलं पान फळाला म्हणालं तुझं माझं नशीबच निराळं ||६|| पिकलं पान पिकलं फळ यांची होते वेगळी वेळ ||७|| पिकलं पान पिकली केळी यांचे महत्व वेगळेवेगळे वेगवेगळ्या वेळी ||८|| पिकलं पान खाली पडलं तिला देण्यासाठी वहीत ठेवलं ||९|| पिकलं पान खाली पडलं जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवलं ||१०|| पिकल्या पान उपयोग किती! झाडाखालीच कुजते त्याच झाडाला खत होण्यासाठी ||११|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०९/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1977
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

पिकल्या पानाचं काय काय घडू शकतं ते समजलं, छान कल्पनाविस्तार! पिकलं पान झाडाला म्हणते बाय बाय माझं आता काय काम? ||१|| इथे 'माझं आता काम काय' असं म्हंटलं तर ? यमक पण जुळेल...असं आपलं मला वाटतं.

दिवसेंदिवस तुमच्या कवितेत कल्पनांचे वेगळेपण दिसत आहे. वरती अथांगने म्हटल्याप्रमाणे थोडी यमकांची सफाई साधता आली तर कविता आणखीन खुलेल. पुकशु. (आस्वादक)चतुरंग

धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब अन वाचकहो. काय आहे की गाडीच्या कारखान्यात कामगाराने निट ठाकठोकीचे काम न केल्यामुळे असले कोचे गाडीच्या पत्र्यावर राहून जातात अन गाडी शोरूम ला आणायची घाई नडते मग. मग एखादं गिर्‍हाईक ते कोचे निट पाहते अन कोचा असलेला पत्रा/ भाग बदलावा लागतो शोरुममध्ये किंवा मग गाडी परत कारखान्यात जाते. कोन भरून देईल मंग नुसकानी मालकाची? :-) अथांग, चतुरंग यांनी सांगितलेला बदल गृहीत धरूनच आगामी वाचकांनी कविता वाचावी. अन त्या बरोबरच खालचे अ‍ॅडवलेले कडवे पण वाचावे. पिकलं पान पडलं खाली पुस्तकात ठेवलं जाळी झाली || पानची जाळी झाली, जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले यात कल्पनेची पुनरावृत्ती झालेली आढलेल. त्यासाठी कवितेतील प्रत्येक कडवे चारोळीच्या चालीवर बघीतल्यास योग्य ठरेल.

पाहिलं आहे... पिकलं पान डुलत, झुलत अलगद खाली.. पण बघता-बघता, भरधाव गाडीच्या- चाकाखाली :(

पिकल्या पानाचं वर्णन की हो चांगलं .

पिकल्या पानची आगळीच तर्‍हा... पाषाणभेद आणि काव्यझरा(?) !!! बाय द वे - अथांग'भाय' नाय - अथांग 'ताय' हाय - मिपाकरांच्या भाषेत 'तै' हो !