मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निम्मा रस्ता चालला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
निम्मा रस्ता चालला
पार्‍श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे. (एक दुसराही विचार असा करता येईल:- रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )
कोरसः निम्मा रस्ता चालला मागं वळतो कशाला? म्होरं जायाचं जायाचं आता थांबतो कशाला? ||धृ|| . . . . हिरो: वाट अवघड, मधी दगड बाजू करू कसा? ||१|| नाही माहित कुठं जायाचं कुना पुसू कसा? ||२|| प्वाट उपाशी, भेट नाही भाकरीशी पेयाला पानी शोधू कसा? ||३|| आंग दमल, पाय थकलं पाऊल टाकू कसा? ||४|| दाट जंगल, उभं ठाकलं पार करू कसा? ||५|| उभी चढण, खाली पडनं आता रोखू कसा? ||६|| नाही शेवट, मोठी वाट पाऊल उचलू कसा? ||७|| लई दिवसांचा चालतो धिर राखू कसा? ||८|| कोरसः निम्मा रस्ता चालला मागं वळतो कशाला? म्होरं जायाचं जायाचं आता थांबतो कशाला? ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/१०/२०१०

वाचने 1314 वाचनखूण प्रतिक्रिया 3

गणेशा 26/10/2010 - 13:13
अतिशय छान .. फक्त "प्वाट उपाशी, भेट नाही भाकरीशी" हे छान असुनही ठेका चुकलेले वाटले .. बाकी संपुर्ण कविता खुप आवडली ...