आई मिटलेला श्वास १३: स्वप्नथेंबांची पालखी
लेखनविषय:
काव्यरस
आई मिटलेला श्वास १२
शुन्य शब्दांत या
भावनांची झोळी
रक्तात उतरलेली
सांजसंध्या कोवळी
घनदाट आठवांचा
सैरभैर पसारा
अर्धओले मन
सावळभाव गहिरा
बधिर पावले ही
तिमिरात थबकली
अस्तित्वाची किनार
क्षितिजापार बुडाली
आई .. तुझ्या आठवांची
पंक्ती आकाशी भिडलेली
ह्रद्यस्थ माझ्या जपलेली
तवअस्तित्वाची कोरीव लेणी...
स्पंदणांच्या हिंदोळ्यावरी
विचारांची अवखळ फ़ांदी
दु:खाच्या तरंगावरती
स्वप्नथेंबांची पालखी
निशब्द शांततेत साठलेले
काहुर मनातले अस्तव्यस्त
हरवलेल्या मार्गावरती
तुझी आशादायी मुर्ती...
--------- शब्दमेघ
वाचने
1834
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
फारच छान!
घनदाट आठवांचा सैरभैर
आई .. तुझ्या आठवांची पंक्ती
कैरी, निवेदिता ताई आणि