लेखकप्रकाश१११यांनी शुक्रवार, 01/04/2011 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाखरे आता मोठी झालीत ..
पाखरांचे पक्षी झालेत .
उडण्याचे बळ आलेय त्यांच्यां पंखात
डोक्यावरचे आभाळ त्याना आतां कमी पडू लागलेय
त्यांची नजर आता खूप दूरवर
क्षितिजाच्या पार....
लेखकनिनावयांनी शुक्रवार, 01/04/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
विझले आज दिवे सारे
रात्र माझी डोळ्यांत सरे
अंधाराची वाटे भीती
निशेस आज सांगू कसे
दिशा नसावी दिशेस साथी
वाटेनं सोडल्या पाउल खुणा
पत्ता विचारे मज तो वारा
वादळ मनी मग माझ्या उठे
बनले मी दिव्यातील वाती
आस माझी आज सारी जळे
हरविले सारे घेतात शोध
समोर मी न कुणास दिसे
विझले आज दिवे सारे
रात्र माझी डोळ्यांत सरे
अंधाराची वाटे भीती
निशेस आज सांगू कसे
लेखकनिनावयांनी गुरुवार, 31/03/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
शोधते आहेस मला कुठे तु
मनी तुझ्याच वसतो मी
असलो दूर जरी असा
जवळच तुझ्या असतो मी
नको शोधूस इतरत्र मज
बघ जरा डोळे मिटून
वेडी माझी प्रिये कशी तु
डोळ्यांत तुझ्या असतो मी
शोधू नकोस बाहेर मज
तिथे दिसेल पुतळा माझा
माझ्या सारखाच,
मात्र कधी तो नसतो मी
जगतो तुझ्या श्वासात असा
सुगंधच तुझा असतो मी
कुशीत तुझ्या भासेन तुला
तिथेच तर सदा असतो मी
लेखकसोनल कर्णिक वायकुळयांनी बुधवार, 30/03/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
धुराच्या ढगात वेढलेला, आणि
चारी बाजूनी घोंगावणा-या
चारचाकी यंत्राच्या गोंगाटात,
डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या
करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत
तल्लीन झालेला तो रंगारी…
त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय,
हे ओळखण तसं कठीणच.
जपणा-या माणसांपेक्षा
मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या
यंत्रांची जंत्री वाढली कि
हे अस व्हायचंच…
लेखकविश्वेशयांनी बुधवार, 30/03/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ...
अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन
माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो
लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ...
हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा
आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ...
दाखवलास मज आरसा माझ्याच भ
लेखकमुक्तसुनीतयांनी बुधवार, 30/03/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी आहे
मी आहे एक सट्टा
पाच हजार कोटींचा
(सगळे खेळाडू नि बुकी मिळून)
मी आहे एक कमांडो स्क्वाड
काही डझनांचा
(पोलीस बिलिस चिल्लर सोडून )
मी आहे एक खेळ
बावीस जणांचा
(बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून)
मी आहे एक झिंग
मी आहे शिव्यांचा पाऊस
मी आहे टाळ्यांचा कडकडाट
मी आहे एक ईर्षा
मी आहे चढलेला त्वेष
मी आहे दडपलेला द्वेष
मी आहे एक भोळसट प्रार्थना
मी आहे एक करोडोंची संधी
मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी
मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या
मी आहे एक दिवस
काल आणि आजसारखाच.
मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )
लेखकविदेशयांनी मंगळवार, 29/03/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
साखळीतल्या कुत्र्यावर -
ते खूपच माया करती ;
' माया ' नसल्या नात्यावरती
ते का डाफरती ?
त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची
उधळण होते सगळीकडे !
माझी नजर मात्र वळते -
माझ्या गळक्या खिशाकडे ?
रस्त्यावरून जाताना ,
एक भिकारी दिसतो ;
उपहासाने माझ्याकडेच
पाहून का हसतो ?
धडपड माझी चालू आहे -
पतंग उडवण्यासाठी !
दोर राहू द्या - रीळहि साधे
नाही , सध्या हाती !
एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये
गर्दी करीत असतो !
गर्दीच्या खिजगणतीमध्ये
कुठेच 'मी ' का नसतो ?
लेखकनिनावयांनी मंगळवार, 29/03/2011 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग
वाहते आहे भरुन इतुके
मनी झरेच झाले आज
पाउल पुढे पडतांना
दिशा गुंतत आहेत आज
धुकेच धुके आहे समोर
न दिसते आहे काही आज
अशी हरविले आहे मी
न ओळखे आज मज कुठली वाट
न मावे पदरात माझ्या आज
एकटीच वाढे हि अंधारी रात्र
सरकते आठवणींचे थेंब अलगद
काजळ पुसते मी पसरते आज
कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग