शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

विदेश जे न देखे रवी...
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !
वर्गीकरण
लेखनविषय:

6 टिप्पण्या 1,881 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

कच्ची कैरी नवीन

>> पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला>>व्वा काय कल्पना आहे !कविता मस्तच जमुन आलीये !