श्वास श्वासात...
लेखनविषय:
श्वास श्वासात...
कोण कोणात...
जीवनाची धावाधाव !!
भासांचाच भास...
मनाची आरास...
पायांचा भ्रमन नाच
घातावर मात...
लढणारी पात...
मरणावर जीवन सरशी
अंतरीचा नाद...
ह्रदयाची साद...
घे आयुष्याची गिरकी !!
-- शब्दमेघ
वाचने
2590
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
गणेशा -खूपच छान नि छान रचना
भासांचाच भास...
मनाची आरास...
पायांचा भ्रमन नाच
घातावर मात...
लढणारी पात...
मरणावर जीवन सरशी
मस्तच....
छान
मस्त आहे कविता !दोनदा वाचली तेव्हा लक्षात आली पण फायदाच झाला त्यामुळे :)
भासांचाच भास...
मनाची आरास...
पायांचा भ्रमन नाच
हे आवडलं!
In reply to भासांचाच भास... मनाची by नगरीनिरंजन
हेच जास्त आवडलं.
In reply to हेच जास्त आवडलं. by पैसा
आवडले. कविता आवडली.
मला बहीणाबाई चौधरी यांची कवीता आठवली,
" आला सास(श्वास्),गेला सास,
नाही सरलं रे जीनं,
आरं जगण-मरण,
एका सासा च अतंर"
नाद ब्रम्हाचा...
अंत जीवनाचा...
फ़क्त शरीरत्याग !!
हे नाही पटले!
बाकी छान!! :)
राघव
In reply to नाद ब्रम्हाचा... अंत by राघव
@ राघव
अपेक्षित बदल केला आहे , कडव्यातील शब्द बदलता आले नाही.. पण त्या कडव्याशीवाय ही मुळ अर्थ तसाच राहिल्या कारणाने ते कडवे काढले आहे.
धन्यवाद ..
@ ऑल
सर्वांचे मनापासुन धन्यवाद ...
अप्रतिम गणेशा!
पण तरीही राग येणार नसेल तर्...आयुष्य... अस लिहाव अस सुचवेन.
In reply to अप्रतिम गणेशा! पण तरीही राग by स्पंदना
प्रथमता सर्वांचे आभार ..
@ अपर्णा जी...
राग का हो येईन बरे ...
तुम्ही आपले पणाअने योग्य सांगितले त्यातच आनंद आहे ...
योग्य बदल केला आहे..
मस्तच
म्हराज, तुम्हास्नी __/\__
घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशीहिथ फिदा बरका...
गणेशा -खूपच छान नि छान रचना