लेखकस्वर भायदेयांनी सोमवार, 28/03/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी असा
मी तसा
मी कसा
जसा भित्रा ससा
मी स्वार्थी
हो मी स्वार्थी
करतो फक्त
तेजाची आरती
देश माझा
मी नाही देशाचा
ना मी माझ्या
पेशाचा
मी शिख, मी हिंदू
मी पारशी
झाले सगळेच
स्वार्थी
लेखकप्रकाश१११यांनी सोमवार, 28/03/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला
उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला
स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां
मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला
शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे
काटकसर करून करून आयुष्य जगायचे
लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली
हनिमूनला न जाता घरीच गात बसली
डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे
स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे
खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा
पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा
देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा
कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा
नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची
चालण्यासा
लेखकदीपा मानेयांनी रविवार, 27/03/2011 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी
का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी
कुठे मंद पवन हळू गुप्त झाला
का फुले पानाशी धरतात हा अबोला?
दूर देऊळाची समाधी जणु लागलेली
तिची शांतता पसरली ही आसमंती
की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी
कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी!
लेखकहर्षद प्रभुदेसाईयांनी रविवार, 27/03/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे जणू एक फुलपाखरूच होते..,
असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते ।
इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले,
की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले ।
घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले,
आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले ।
इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले,
विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले ।
खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले,
भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते ।
हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले,
फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले ।
वणवण फिरले शोधूनी थकले..
लेखकविदेशयांनी रविवार, 27/03/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रु समोरून थेट वार करुन गेला -
मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला !
मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला
सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला !
सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला -
तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला !
पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला ,
अवसेला काजवाच चकित करुन गेला !
भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला
सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !
लेखकनगरीनिरंजनयांनी रविवार, 27/03/2011 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
चांद रात मंद वात
गंध श्वास टाकतो
धुंद साथ उष्ण हात
कंप हृदयी जागतो
नील जल प्रतिबिंब
चंद्र त्यात पाहतो
लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प
पारिजात ढाळतो
रक्त ओष्ठ रक्त नेत्र
भ्रमरही मोहतो
मत्त वक्ष पुष्ट गात्र
समीर हाताळतो
एक भास एक ध्यास
प्रेम वह्नी जाळतो
व्यस्त केश भ्रष्ट वेश
मुकुंद रास खेळतो
धूम्र वर्ण पीत वस्त्र
अधर तो चावतो
मीलनातुर झाली राधा
कृष्ण वेड लावतो.
- (पूर्वप्रकाशित)
लेखकनिनावयांनी रविवार, 27/03/2011 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजा वर मावळतांना तु
मज वर प्रेम करशील का?
श्वासांमधल्या अंतरामधुनी
शोध माझा घेशील का?
समोर दिसून लांब किती तु
जवळ मज येशील का?
अंतर मिटता मिटता
मज तु उमजशील का?
प्रत्येक प्रहर अशी अनोळखी
तु ही मज विसरशील का?
न संपणार्या वाटा कधी ह्या
पलीकडे मज नेशील का?
तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू
नेसतात लाटा उठणार्या मनी
तारका लाजवतात मज बघुनी
कुशीत मज तु लपवशील का ?
तीच वाट अन तेच प्रवास
न तु इथे, न तुझे सहवास
शोधत तुला फिरते नजर
पुन्हा मज तु दिसशील ना?
क्षितिजा वर मावळतांना तु
मज वर प्रेम करशील का?
श्वासांमधल्या अंतरामधुनी
शोध माझा घेशील का?
लेखकविदेशयांनी गुरुवार, 24/03/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा शुभ्र कापूस जसा
इवला पिटुकला होता ससा
लाजरा बुजरा भित्रा जरा
अवखळ चपळ होता ससा
एकदा मळ्यातून फिरता फिरता
गेला तो तळ्याकाठी तडक
इवल्या पिटुकल्या सशाला
दिसला मोठा एक खडक
खुदकन ससा मनात हसला
ऐटीत खडकावरती बसला
थोड्या वेळाने झाली गम्मत
सशाला वाटली जम्माडी जम्मत
खडक लागला हलायला
ससोबा लागले डुलायला
अचानक घडले तरी काय
सशाचे थरथरले की पाय
सशाला वाटले झाला भूकंप
त्याच्या अंगाला सुटला कंप
पाहिले त्याने पायाखाली
जीव झाला वर खाली
नव्हता पायाखाली खडक
होती कासवाची पाठ टणक
कासवाने हलवली हळूच मुंडी
ससोबाची उडाली घाबरगुंडी
धूम ठोकली सशाने मळ्यात
कासव निघाले निवांत तळ्यात
लेखकक्रान्तियांनी बुधवार, 23/03/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !
देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !
तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !
जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !
कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !