Skip to main content

कविता

डाल ग कोंबडी डाल

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 20/05/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
डाल ग कोंबडी डाल
डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ|| चोच बारीक लाल लाल पिसं पळतीया कुठं, पकड निट हाती धरून आण तिला इथं नको करू तिच्या जिवाचे हालं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१|| तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत पोरासोरांना खेळू नको देवू तिथं एकांत मिळू दे दोघांना आता कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग डाल ग

नि:संशय

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/05/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
नि:संशय......... खरं तर, ती होती; म्हणून कविता जन्माला आली........... तिच्या अस्तित्वाने ओढ निर्माण झाली आणि अप्राप्यातून ईर्षा....................... सुदैव...........

दृष्टीआड

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/05/2011 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टीआडच्या बोलण्या-प्रतिसादावरून त्यांचं खळखळतं व्यक्तिमत्व एकमेकांच्या गंमतीशीर फिरक्या घेतंय असंच वाटलं असतं कुणालाही..................... मात्र, त्या अवखळामागे दडली होती त्यांची अव्यक्त संपृक्त संवेदना आणि गुदमरलेल्या संवेदनेपाठची जुळी वेदना.......... अगतिक......हतबल....चंचल........ रिक्तातील कल्पना,..... अव्याहत,..... वास्तवातले अपेक्षाभंग तुडवत, आयुष्याला, मनस्वी....स्वप्नमय......मुग्धगात्र करू पहात होत्या................ आवाजातला मधुतम अंदाज श्वासांतला चिरसंध अश्वास श्रवणातला हवाहवासा दृढविश्वास साकारत होता त्यांच्यात एक रंजक-रंजित-मयरत-रसाळ-मेघाळ-मधाळ नीरव-एकांत-शांत-संथ दुष्यंत सह

नखरा नाही इतका बरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/05/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून
काव्यरस

आयुष्य पार सरलेले

लेखक स्वानंद मारुलकर यांनी गुरुवार, 19/05/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
तडजोडी करता करता आयुष्य पार सरलेले स्वप्नांची वाफ उडाली कोरडे-शुष्क उरलेले आता न वळे पाऊल वाटेवरती गाण्यांच्या कंठात रुते आवाज ओठही बंद शिवलेले हे दुःख आत ना मावे बाहेर येतही नाही पाहून पोरकी स्वप्ने डोळ्यांशी डबडबलेले माझे मन मोठे कोडे सुटता न सुटे थोडेही बाहेर दिसे स्वच्छंदी आतूनी बुरसटलेले खांद्याला घेऊन ओझी मसणात रोजची वारी एकेका दगडा खाली एकेक स्वप्न पुरलेले - स्वानंद
काव्यरस

मंत्रमुग्ध तळे

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 19/05/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
ललगा लगाल लगागा लगागा असे काय होते तळ्याच्या किनारी रुपेरी जला ये शशीची खुमारी अशी पावसाने भिजूनी लव्हाळी जळी भासे चिंब फ़ुलांची डहाळी कुठे झाड गाते सुरांची तराणी पवनात वाजे सुखाचीच गाणी वसे आसमंति पऱ्यांची कहाणी नसे थेंब आसु दुखांची विराणी तळे ह्या सुखाने दुथाडी भरूनी असे थेंब थेंबि मनी साठवूनी जरि बैसलो हे अप्रुप बघूनी तरि चित्त माझे उडाले फ़ुलूनी असे काय होते तळ्याच्या किनारी खुलल्या रुपेरी मनाच्या किनारी येइ मोहरूनि उभारी थरारी मन पाखरू नभि मारी भरारी
काव्यरस

गातेस घरी तू जेव्हां

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/05/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) गातेस घरी तू जेव्हां जीव सुटका-सुटका म्हणतो शांतीचे विणता धागे संसार नेटका होतो ! छत भंगुन वीट पडावी हल्लाच तसा ओढवतो ही पाठ कणाहिन होते अन् चेहरा बारका होतो ! ये घरमालक दाराशी हळु गाण्या , तो खडसावे खिडकीच्या उघडुन दारा तो बोंबा मारून जातो !

नसबंदी

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 16/05/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे गोजिरवाणी स्वप्ने माझी घ
काव्यरस

थेंबे-थेंबे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/05/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब टपकला तिच्या करूण डोळ्यातून बोच रुतवून गेला हताशलेल्या काळजामधून एक थेंब गळला थबथबलेल्या कपाळावरून आशा रुजवून गेला भेगाळलेल्या जमिनीतून एक थेंब प्रवेशला शिंपल्याच्या ओठांमधून बोच छुपवायला लपला चंदेरी टोपडे पांघरून एक थेंब चुकार दमला पोहून पोहून शर्यतीमधून हरला अडला बंद दार बघून एक थेंब निसटला अभेद्य आवरणामधून मिलनाचा सांगावा आला वाट पहाणाऱ्या फ़ळातून एक थेंब पसरवला गोलाकार कळकटामधून चंदेरी साज झळालला पात्राच्या अंगांगावरून एक थेंब मोहरला आसुसलेल्या जमिनीमधून तृप्त सुगंध महकला उन्हा्ळलेल्या झळांमधून थेंब थेंब जमवला अनुभुतीच्या ओळींमधून शब्दसाज जर भावला द्या दाद प्रतिस