मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असेलही कुठे कुठे

bhaktipargaonkar · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?

वाचने 1076 वाचनखूण प्रतिक्रिया 4

निनाव 24/04/2011 - 12:30
फक्त एक सुझाव. शेवटच्या ओळीत : "स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?" ह्या एवजी : "स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी?" रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी? >>> असा बदल करता येउ शकेल काय ते पाहा. बाकि कविता सुंदरच आहे. कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रथम असेल. पण कविता सुचण्याचा नव्हे :). असेच लिहित राहा. - शुभेच्छा!

अप्रतिम रचना!! पहीली कविता आहे असे अजिबात वाटत नाहीये! माझ्या मते काही विशेष बदल न करता फक्त सादरीकरण असे असावे:
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल कधी जिणे? कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या र्‍हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!