दृष्टीआडच्या बोलण्या-प्रतिसादावरून
त्यांचं खळखळतं व्यक्तिमत्व
एकमेकांच्या गंमतीशीर फिरक्या घेतंय
असंच वाटलं असतं कुणालाही.....................
मात्र,
त्या अवखळामागे दडली होती
त्यांची अव्यक्त संपृक्त संवेदना
आणि
गुदमरलेल्या संवेदनेपाठची
जुळी वेदना..........
अगतिक......हतबल....चंचल........
रिक्तातील कल्पना,.....
अव्याहत,.....
वास्तवातले अपेक्षाभंग तुडवत,
आयुष्याला,
मनस्वी....स्वप्नमय......मुग्धगात्र
करू पहात होत्या................
आवाजातला मधुतम अंदाज
श्वासांतला चिरसंध अश्वास
श्रवणातला हवाहवासा दृढविश्वास
साकारत होता त्यांच्यात
एक
रंजक-रंजित-मयरत-रसाळ-मेघाळ-मधाळ
नीरव-एकांत-शांत-संथ
दुष्यंत सहवास...................
भेटीची ओढ आणि एकरूपतेची उत्प्रेक्षा
हसण्यातून खिदळत असली तरी
वळचणीतला कोमल गंधार
शृतींवरचा त्याचा प्रभाव लपवू शकत नव्हता...............
पलिकडल्या गच्च अंधारात
तरंगत होते
दोघांचेही संसार-संस्कार.........
सोबत,.........
आसक्त-अतृप्त-आतर्क्य-अटळ
जन्मालंकार............................... !!!
.............अज्ञात
याद्या
1196
प्रतिक्रिया
3
लेखनविषय:
मिसळपाव
अवघड शब्दांची बांधणी त्यामुळे आशय भरकटला.
कोमल गंधार
In reply to अवघड शब्दांची बांधणी त्यामुळे आशय भरकटला. by दत्ता काळे
भरभरून घेतला...