Skip to main content

कविता

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/06/2011 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ|| कित्येक लढले याच्यासाठी कितीकांनी दिधले प्राण याच्याचसाठी कितीकांनी फासात घातली मान देवासमान हा आम्हास त्याचा मान आम्ही राखू ||१|| क्रांतीकारी अन समाजसेवक हाती घेवून जातसे चालत शत्रूच्याही उरात बसती उंच पाहून याला धडकी न राहू मागे आपण चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२|| युद्ध जरी हो आज नसले भय देशावरी रोजच कसले दहशत घालती दहशतवादी फुकाची करती वादावादी झाला
काव्यरस

संधिकाल

लेखक धनंजय यांनी बुधवार, 15/06/2011 03:15 या दिवशी प्रकाशित केले.
संधिकाल - - - मीलनाचा संधिकाल ____________लाल झाला संधिकाल : पश्चिमेला लाल मोती- ____________शिंपल्यांचा संधिकाल : चांदण्यांनी शिंपलेला___ ____________मोजक्याशा संधिकाल : कंजुषीने मोजलेल्या ____________दोन घटका संधिकाल : या दिनाच्या दोन घटना__ ____________संधिकाल न् संधिकाल - - -

गालिब

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 14/06/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः हिंदीमध्ये काही लिहीण्याचा प्रयत्न केला होता. हि गजल नाही. कविताच आहे. गालिब ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
काव्यरस

सण पाऊस साजरा ---

लेखक विदेश यांनी मंगळवार, 14/06/2011 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
निळ्या निळ्या नभातून - कोसळती शुभ्र धारा ; काळ्या काळ्या मातीतून - ओल्या गंधाचा फवारा ; हिरव्या हिरव्या कोंबातून - दिमाखात ये फुलोरा ; पिवळ्या पिवळ्या फुलांतून - झुले तो सोनपिसारा ; अज्ञातशा कुंचल्यातून खेळ रंगतो हा न्यारा ! सप्तरंगी अफलातून इंद्रधनूचा नजारा - फुलतो रोमांचातून मनमोराचा पिसारा - होई चिंब मिठीतून ... सण पाऊस साजरा !
काव्यरस

पर्सनल अकाऊंट

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 13/06/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...
काव्यरस

जय जय लंबोदरा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/06/2011 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय लंबोदरा
जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| विनंती आमची तुझीया ठायी करीतो आर्जव नमीतो पायी सकल कार्य नेई सिद्धीस आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१|| रूप अन गुण तुझे कितीक वर्णू मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू फळ द्यावया कष्टास आमच्या करीतो आम्ही तुझा पुकारा ||२|| जय जय लंबोदरा आदीदेव तू विद्यासागरा लवकरी ये संकटहरा जय जय लंबोदरा ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०६/२०११
काव्यरस

चबुतरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्यागर्द झाडीत, जुन्या चबुतऱ्यावर उन्ह पाऊस झेलीत, उभी आहे दगडी छत्री पायथ्यात विसावलेल्या कोण जाणे कुणाची महानिद्रा सांभाळीत, वखवटातात जीवनाच्या तिच्या आजुबाजुला, निर्मितीचा नंगा नाच चालू आहे अव्याहत, मरणाच्या एकटेपणावर हिरवे काळे बुळबुळीत लिंपण लावीत जीवनाने पाय रोवले आहेत छत्रीच्या माथ्यावर उडणारे पक्षी मधूनच कधी टेकतात अस्वस्थ माना वळवून शोधतात शोधतात मागे राहिलेल्या कुणाला तळात छत्रीचा कुणीतरी, नेहमीसाठी जवळ. हंबरत येवून एखादी गाय पळभर विसावते छत्रीच्या दगडी चबुतऱ्याशी घासून मान थोडी शमवते रुखरुख तो शांत आतमधे, नाही कसलीच बोच कॅमेरा रोखून कोणी प्रवासी घेतो फ़ोटो खांबाशी रेलत्या हस
काव्यरस

हायकू १

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/06/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
हायकू १
एक फुलपाखरू दगडावर बसलं मनात म्हणालं कसं फसवलं मातीमधली ढेकळं काळी पिवून पावसाचं पानी व्हत्यात मातीवानी कुकुचकु कुकुचकु कोंबडा ओरडतोय कुकुचकु तेच आहे का त्याचे हायकू? दरीच्याच काठावर घसा खरडून ओरडतोय माझाच आवाज परत येतोय सांजचा सुर्य क्षितीजावर बुडला किनार्‍यावर दगड रडला हिरवे रान हिरवेगार पाउस नव्हता तर पिवळेशार पिवळेशार समाधी लागावी म्हणून डोंगरावरचे देवूळ अंधारात जाते बुडून पाखरांचा थवा पोटासाठी सकाळी घरट्यातून उडतो सायंकाळी परत येतो - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०६/२०११