Skip to main content

कविता

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/10/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

आला पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/10/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाऊस
गर्जत वर्षत आला पाऊस हर्षत नाचत आला पाऊस कुंद नभ मोकळे करूनी धरेवरती कोसळला पाऊस विद्यूल्लता तेजाने चमके कडकड करूनी झळके सवेत येवूनी थेंब जलाच्या आक्रंदून पडला पाऊस अतीवेगाने तुफान वाहते तरूवेलींचे पर्ण हालते भांग शाखीय शिस्तीचा विस्कटून गेला पाऊस झरे नद्या तलाव सागर जलाशयांची रुपे अगाध एकात दुसरे दुसरे एकात मिसळूनी गेला पाऊस कोठे पडला छतावरी कोठे आला माळरानी कोठे पडूनी शेतामध्ये धान्य पिकवूनी गेला पाऊस उष्णउसासे देवूनी अंगी शहार्‍यांची टोचूनी नांगी अमृतमय जीवन देवूनी गेला पाऊस - पाषाणभेद १

टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 14/10/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत अबलख माझा घोडा - आई बाबा आजी आजोबा सरका रस्ता सोडा ! दोनच पायांच्या घोड्याची घरभर भरभर घाई पटपट झुरळे दूर पांगती खुषीत येते आई ! हातांचा हा लगाम धरुनी वेगाला मी आवरतो ऐटित मागे पुढे डोलुनी घर-मैदानी वावरतो ! घोडोबा मी घरी लाडका खेळायाला पुढे पुढे - शंभर टक्के परीक्षेत गुण अभ्यासातहि सदा पुढे ! तबेल्यात बेजार हा घोडा आठवड्यातले दिवस सहा - चंगळ घोड्याची रविवारी हैराण हे घरदार पहा !!

रक्तगंध

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 13/10/2011 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता. हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार. रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र कौलारु खोल्यांमधुनी अजुनी तो रात्री भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी ध

ती... धूंद

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 13/10/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा... हो..येक ह्रायलच ...
काव्यरस

कालच आई स्वप्नात येऊन गेली ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/10/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आई स्वप्नात येऊन गेली माझ्या केसात हात फिरवून हलकेच मला म्हणाली किती राब राबतोसरे तू थोडासा आराम करीत जारे बाळा काम काम नि अविरत काम मग आराम कधी करशील बाळा ...? कसा जीव माझा व्याकुळ होऊन गेला तिच्या आठवणीने जीव ओला ओला झाला सतत काळजी तिची सवय होती पोरांच्या सुखासाठी ती राब राब राबत होती देवाजवळ दिवा नि हात जोडून प्रार्थना सुखाची याचना फक्त पोरासाठी स्वप्नात येऊन ती काय म्हणाली ..? भूक लागली असेल नारे तुला थांब जरासा आपला जुना तवा लोखंडाचा मी शोधून काढते आणि तुझ्यासाठी छान पिठले टाकते असे म्हणून ती आत गेली तिची वाट बघता बघता मला कशी जाग आली ...? मी तिची वाट बघत बसलो नि जाणीव झाली आ
काव्यरस

प्रवास

लेखक प्रिया ब यांनी मंगळवार, 11/10/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी नेहमी वाटे कधी आपण मोठे होणार!!! बाबांसारखी brief case घेऊन कधी बरं office ला जाणार कल्पना साडी नेसून खेळू मैत्रीणी घर-घर हातात purse आईची आणि बाहुली असे कडेवर हळू हळू शिकत पुढे शिक्षण आपलं पूर्ण करतो टप्पे टोणपे खात engineer म्हणून बाहेर पडतो मग सुरू होतो आपला खरा अनोळखी प्रवास चालू होतात Campus Placements साठी चकरा आणि वाचू लागतो Classifieds Written Test, Tech round, HR च्या सापडतो जाळ्यात काही प्रयत्नानंतर अडकून जातो Corporate च्या विळख्यात Induction program नी मन अगदी मोहून जातं घर्-बस-office-weekend हे सगळंच अंगवळणी पडतं Office सुदधा एक शिक्षणाचं दालन बनतं, भेटतात स्वभाव चित्र