Skip to main content

कविता

गजरा (2)

लेखक फिझा यांनी मंगळवार, 01/11/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
3

सुट्टी संपली -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 01/11/2011 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी संपली दिवाळी झाली घण घण घंटा ऐकायची दप्तर पाठीवरती टाकुन तुरू तुरू घाई पळायची ! पाठांतर अभ्यास परीक्षा वेळच गुंतुन जाण्याची शुद्ध न राहिल शाळेमध्ये डबा उघडुनी बघण्याची ! नवीन कपडे खेळ नवे नीट नेटके जपण्याची सुट्टीमधली सवय रहावी रोज पहाटे उठण्याची ! शंकरपाळी चिवडा लाडू चकली शेव करंजीची वर्षामधला धमाल सण आठवण नुसती करायची ! शाळेमधुनी दमून येता निवांत स्वप्ने पहायची पुढल्या वर्षी किती फटाके चक्रे झाडे आणायची ?

चपराक

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 01/11/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः माझी एक कविता एका महाभागाने चोरुन चक्क आपल्याच नावाने चेपुवर प्रकाशित केली आणि ती नेमकी माझ्या मित्राने पाहीली आणि मला कळवले. ते बघुन असा संताप आला आणि ही कविता सुचली. जरा अतिशियोक्तीच झाली आहे, पण भावनेच्या भरात......... ;) चोरून चोरून तुम्ही चोरणार किती आहे अस्सल हिरा इथे माझिया हाती चोरून काय साधले तुम्ही शब्द माझे ? उजळल्याविना राहील का प्रारब्ध माझे ? आहे अजूनही लेखणीला माझ्याही धार येतो सरसावूनी शब्दांना अजूनच खुमार चोरलेल्या शब्दांचीच तुम्हा बसेल चपराक सणसणीत अस्खलित नाणे माझे वाजेल नेहमीच खणखणीत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/१२/२०१०)
काव्यरस

आरास रास

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 31/10/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
अथांगास काय हिरे माणके सभोवर कनक रुप्याची आरास रास अंगभर तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा सकाळी सकाळि मोतियांचे धुके- स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि उधळे जगी रंग चित्त झुंझवाया ऋणांचे खळे आगळे वेगळे- स्नेह वाटे परी गोत हे सोवळे आंसवांना नसे दु:ख खारे इथे निर्झराचे पिसे अवखळे खळखळे .................अज्ञात
काव्यरस

अर्पणपत्रिका

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 31/10/2011 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया) शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला जेथे अर्थ प्राप्त झाला अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ जेथून व्युत्पन्न झाला, - - त्या स्वराला अर्पिता मम काव्य ॐ कारा तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी जो धूम्र उत्पन्न झाला, - - त्या धुराला अवकाश जे व्याप्त त्यासही भेदून एकमात्र जो बाण गेला बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल बलाचा उद्गम त्या उद्ग्माला, - - वंदिताना जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा त्याचाहि जो अंतरात्मा तद् भावनेला, - - - - - -
काव्यरस

गजरा...!!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 31/10/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
3

कविता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/10/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय कोण आहे? सारखी टक टक टक . . . सहन होत नाहीये आता कोण आहे आत? . . . बहुतेक एक कविता अडकली आहे . . गोजीर्‍या शब्दांची, साजीर्‍या उपमांची, खूप काळ लोटला आहे अडकली आहे, तळघरात . . तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा पण सगळं निष्फळ . . . . . एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली . . . बाहेर पडलीय तर छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ . . . डॉक्टर म्हणाले आता ती अन् तिचे नशीब |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१०/२०११)
काव्यरस

(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 28/10/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही.
काव्यरस

नातं

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 28/10/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच येतो मी इथे रमणीय तळ्याकाठी इथली खास शांतता अनुभवण्यासाठी विस्तिर्ण काठाचं हे तळं मला नेहमीच वेगवेगळ्या रुपात भासतं काठाच्या दाट शेवाळी पाणवनस्पतीवर सतत चमचमणार्‍या पाण्याच्या रेघा त्यावरून डौलाने चालणारे बगळे मध्येच डुबकी घेणारे पाणपक्षी, बेडूक आंत पाण्याच्या मोठ्या तुकड्यावर अमाप छोटी गुलाबी कमळं असतात त्यावर दिसतात फुलपाखरं, चतुर ह्यांच्या भरार्‍या हे तळ्याचं नेहमीचं रुप पण हिवाळ्यात काही काळ हे बदलतं अचानक एके दिवशी तिथे येतात देशांतरीत पाहुणे गुलाबी, पांढर्‍या रंगाचे कलकलाटांनी तळ्याची अभिजात शांतता भंग करीत. पानथळीजागेवर पानापानातून त्यांची मायेची घरटी वसतात. नवी वीण घालतात. हवी
काव्यरस

दूर गाव माझा

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 28/10/2011 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
राहिला दूर गाव माझा मी असा का भरकटलो श्वास इथे अन आत्मा तिकडे खरे, असा मी का जगलो? क्षण क्षणातून जगलो मी का कण कणातून मी वधलो नेत्र इथे अन अश्रू तिकडे खरे, असा मी का रडलो? नव्हता दुश्मन रणही नव्हते दमून पुरता मी हरलो हृदय इथे अन स्पंदन तिकडे अरे असा मी का लढलो? जावे फिरूनी कुशी गावच्या साद गावची घुमत असे उगव भास्करा रात्र ढळू दे प्रभात मंगल पुन्हा दिसे.
काव्यरस